खर्च भागविण्यासाठी तारेवरची कसरत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

खर्च भागविण्यासाठी तारेवरची कसरत
खर्च भागविण्यासाठी तारेवरची कसरत

खर्च भागविण्यासाठी तारेवरची कसरत

sakal_logo
By

सनील गाडेकर ः सकाळ वृत्तसेवा
पुणे, ता. १६ ः माझा व्यवसाय अजूनही पुर्वपदावर आलेला नाही. तसेच जो धंदा होत आहे, त्याच्यातील नफ्याचे प्रमाण महागाईमुळे कमी झाले. पूर्वी जर ४० टक्के फायदा होत असेल तर तो आता १५ टक्‍क्‍यांवर आला आहे. गॅस आणि तेलाच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. तसेच ग्राहकांकडून येणारा प्रतिसाद अजूनही थंडावलेला आहे. त्यामुळे दैनंदिन खर्च भागविण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे... अशी व्यथा प्रातिनिधीक स्वरूपात सांगत होते हिंजवडी आयटी पार्क परिसरातील हॉटेल व्यावसायिक संदीप अडतरे...
पुणे परिसरात राहात असलेले नागरिक, कामानिमित्त ऑफिसला येणारे कर्मचारी, रस्त्यावर नागरिकांची होणारी ये-जा, कार्यक्रमानिमित्त होत असलेली गर्दी या सर्व बाबी कोणत्याही व्यवसायासाठी पूरक असतात. मात्र वर्क फ्रॉम होम कल्चरमुळे अजूनही अनेक आयटीयन्स त्यांच्या मूळ गावी आहेत. तसेच पुण्यात असले तरी त्यांचा घरून काम करण्यावर भर आहे. त्यामुळे आयटी क्षेत्रावर अवलंबून असलेल्या विविध प्रकारच्या व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहे.

पीजीमध्ये अनेक रुम रिकाम्या
चहाच्या टपरीपासून अनेक मोठमोठी हॉटेल शहरातील हिंजवडी, बाणेर, बालेवाडी, बावधन, रावेत, औंध, विमाननगर, खराडी, मगरपट्टा येथील आयटी हबमध्ये आहे. त्यासह इलेक्ट्रॉनिक वस्तू, जीवनावश्यक बाबींचे दुकाने, मिठाई, लॉन्ड्री आणि पेयिंग गेस्ट (पीजी) असे विविध व्यवसाय आयटीयन्सवर अवलंबून आहे. मात्र त्यांच्या व्यवसायावर कोरोना आणि वर्क फ्रॉम होममुळे ३० ते ५० टक्के परिणाम झाला आहे. संध्याकाळी पाय ठेवायला जागा नसलेल्या चहाच्या टपरीसमोर तुरळक गर्दी होत आहे. उत्पन्नाचा चांगला पर्याय म्हणून सुरू केलेल्या पीजीमध्ये सध्या अनेक रुम रिकाम्या आहेत.

कोरोनाकाळात आठ महिने मी मुळ गावी गेला होतो. या काळात माझा व्यवसाय पुर्ण बंद होता. मात्र माझे घरभाडे आणि इतर खर्च सुरूच होता. आम्ही पती-पत्नी आणि तीन मुले असा माझा परिवार पूर्णपणे पाणीपुरीच्या व्यवसायावर अवलंबून आहोत. काही दिवसांपूर्वी मी पुन्हा स्टॉल सुरु केला. मात्र, पहिल्याच्या तुलनेत ५० टक्के देखील व्यवसाय होत नाही. कच्च्या मालाच्या किमतीही मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत.
- लालसिंग बघेल,
पाणीपुरी विक्रेता, हिंजवडी, फेज तीन


कोरोनामुळे मी दोन वर्ष उशिरा रेस्टॉरंट सुरू केला. त्यामुळे सर्व तयारी झालेली असतानाही दोन वर्ष व्यवसाय करता आला नाही. आता व्यवसाय सुरू केला, मात्र नागरिकांचा प्रतिसाद मिळत नाही. आजही अनेकांची पसंती पार्सलला आहे. आठवड्यातून तीनच दिवस कर्मचारी ऑफिसला येत असल्याने व्यवसायावर परिणाम झाला आहे. मात्र, येत्या दोन महिन्यांत परिस्थिती सुधारेल असा अंदाज आहे. कारण, आता कर्मचारी पुन्हा कामावर येत आहेत. मात्र, कोरोनामुळे लोकांना पार्सलची सवय लागली आहे.
- निशांत गुजर, रेस्टॉरंट चालक

व्यवसायावर परिणाम करणारी कारणे
१) अनेक आयटीयन्स घरून काम करीत आहेत
२) प्रतिसाद मिळत नसल्याने दैनंदिन खर्च भागवणे अवघड
३) हायब्रीड पद्धतीचे वर्ककल्चर
४) शनिवार आणि रविवारी घरीच थांबण्याची मानसिकता
५) अनेक बाबी ऑनलाईन ऑर्डर केल्या जातात
६) अनलॉकनंतर वाढलेली महागाई


आर्थिक फटका बसत असलेले व्यवसाय
- हॉटेल
- पीजी
- खाद्यपदार्थांचे विविध स्टॉल
- स्वीट मार्ट
- लॉन्ड्री व्यवसाय
- भाजीपाला वितरण

Web Title: Todays Latest Marathi News Pne22j94992 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top