अवतीभवती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अवतीभवती
अवतीभवती

अवतीभवती

sakal_logo
By

रोटरी क्लब ऑफ पुणे कात्रजच्या
अध्यक्षपदी नमिता नाईक

पुणे, ता. २० : रोटरी क्लब ऑफ पुणे कात्रजच्या अध्यक्षपदी नमिता नाईक यांची नुकतीच निवड झाली. मावळते अध्यक्ष पुष्कराज मुळे यांच्याकडून त्यांनी सूत्रे स्वीकारली.
रूपाली बजाज यांच्याकडून अतुल दुर्वे यांनी सचिवपदाचा पदभार स्वीकारला. या प्रसंगी रोटरीचे प्रांतपाल डॉ. अनिल परमार प्रमुख पाहुणे होते. नाईक यांनी ब्रेस्ट कॅन्सर तपासणी प्रकल्प लोकमान्य हॉस्पिटलसोबत राबविण्याची घोषणा केली. या वर्षी पर्यावरणपूरक तसेच दिव्यांगांसाठी विशेष प्रकल्प राबविणार असल्याची माहिती त्यांनी दिली. संचालक विवेक कुलकर्णी यांनी विविध प्रकल्प कल्पना आणि योजना सादर केल्या. याप्रसंगी झालेल्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राम कुतवळ यांनी केले. मिलिंद कुलकर्णी आभार मानले.
-----------
मुलांचे हक्क आणि कायदेबाबत जनजागृती

पुणे, ता. २० : पुण्यातील विद्यार्थी गृहाचे महाराष्ट्र विद्यालय येथे पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणातर्फे कायदेविषयक जनजागृतीअंतर्गत मुलांचे हक्क, शिक्षणाचा अधिकार, बेटी बचाव बेटी पढाव या विषयांवर मार्गदर्शन शिबिर नुकतेच झाले.
पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव व न्यायाधीश एम. डी. कश्यप, न्यायाधीश चंद्रशेखर पाटील, न्यायाधीश गजानन कुलकर्णी, ॲड. घनश्याम खलाटे यांनी याप्रसंगी मार्गदर्शन केले. कश्यप यांनी देशाचे भावी नागरिक म्हणून कर्तव्यांची जाणीव असणे तेवढेच महत्त्वाचे आहे, असे या वेळी सांगितले. बालकांविषयी अत्याचार, मुलांचे मूलभूत हक्क आणि शिक्षणाचा अधिकार या विषयावर शालेय मुलांना मार्गदर्शन त्यांनी केले. प्राचार्य विष्णू गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम झाला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ॲड. नंदिनी शहासने यांनी केले. डॉ. ज्ञानेश्वर दाते यांनी आभार मानले.
-----------
अण्णा भाऊ साठे यांना
भारतरत्न पुरस्कार मिळावा
पुणे, ता. २० : साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रमात लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार मिळाला पाहिजे व १ ऑगस्टच्या जयंतीदिनी शासकीय सुट्टी मिळाली पाहिजे, अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली.

साठे यांच्या सारसबाग येथील पुतळ्याजवळ झालेल्या कार्यक्रमात सर्वपक्षीय राजकीय व सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी यांच्याबरोबर पुणे शहर जिल्हा मातंग समाजाचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. या प्रसंगी अण्णा भाऊ साठे जयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष शंकर शेंडगे, सचिव विकास सातारकर, माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे, माजी सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, माजी राज्यमंत्री मधुकरराव कांबळे, माजी आमदार राम गुंडीले, माजी नगरसेवक अविनाश बागवे, भारतीय दलित विकास आघाडीचे रवी आरडे, काँग्रेसचे अभय छाजेड, शहराध्यक्ष अरविंद शिंदे, शिवसेना शहरप्रमुख संजीव मोरे, मनसे शहरप्रमुख साईनाथ बाबर, जयराज लांडगे, रिपब्लिकन पक्षाचे शैलेश चव्हाण, परशुराम वाडेकर, राहुल डंबाळे, मातंग समाजाचे अशोक लोखंडे, दत्ता जाधव, ललित तिंडे आदी या प्रसंगी उपस्थित होते.
---------------
शैलेश म्हेत्रे यांची प्रदेशाध्यक्षपदी निवड

पुणे, ता. २० : अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी शैलेश म्हेत्रे यांची निवड झाल्याची घोषणा संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष गोविंद परमार यांनी नुकतेच जाहीर केले.
---------
(फोटो हार्डकॉपी)

Web Title: Todays Latest Marathi News Pne22k75478 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top