पालखीमार्गावरील खाद्यतेल ‘ओके’मदी! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पालखीमार्गावरील
खाद्यतेल ‘ओके’मदी!
पालखीमार्गावरील खाद्यतेल ‘ओके’मदी!

पालखीमार्गावरील खाद्यतेल ‘ओके’मदी!

sakal_logo
By

पुणे, ता. २० : पुणे जिल्ह्यातील पालखी मार्गावरील ४११ अस्थापनांची तपासणी करण्यात आली. त्यातील १०८ तेलाच्या पुनर्वापराबद्दल तपासण्या झाल्या. पैकी फक्त एकाच ठिकाणी तळण्यासाठी काळे तेल वापरले जात होते, हे उघड झाले. उर्वरित ४१० अस्थापनांमधील खाद्यपदार्थांची गुणवत्ता चांगली होती, अशी माहिती अन्न व औषध प्रशासनतर्फे (एफडीए) बुधवारी देण्यात आली.
एकाच तेलात वारंवार खाद्य पदार्थ तळल्याने काळे झालेल्या तेलाच्या तपासणीचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प ‘एफडीए’च्या पुणे विभागातर्फे हाती घेण्यात आला होता. त्याची सुरवात संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यापासून करण्यात आली. पुणे जिल्ह्यातील आळंदी व देहू येथून सुरू होणाऱ्या पालखी मार्गावर ४११ ठिकाणी केलेल्या तपासणीच्या आढाव्यातून ही माहिती पुढे आली आहे.

वडापाव, सामोसे, भजी असे पदार्थ वारंवार उकळलेल्या तेलात तळल्याने त्याचा ‘टोटल पोलर कंपाउंडस्’च्या (टीपीसी) वाढतो. त्याला वास येऊ लागतो. त्या तेलातून धूर येतो. अशा काळ्या तळलेल्या खाद्य पदार्थाचा दुष्परिणाम थेट मानवी आरोग्यावर होण्याचा धोका असतो. त्यापासून पालखीत सहभागी वारकरी आणि भाविकांना सुरक्षित ठेवण्यासाठी हा उपक्रम हाती घेण्यात आला होता.
- संजय नारागुडे, सहआयुक्त, ‘एफडीए, पुणे विभाग

‘टोटल पोलर कंपाउंडस्’ म्हणजे काय?
एकाच तेल सतत खाद्यपदार्थ तळल्याने पेरोक्साइड आणि हायड्रोपेरॉक्साइड तयार होतात. त्यातून ‘शॉर्ट चेन फॅटी ॲसिड’, ‘किटोन्स’ अशा उत्पादकांचाही त्यात समावेश असतो.

असे तपासले काळे तेल
- १७ ‘टीपीसी’ उपकरणांच्या माध्यमातून अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी तपासणी केली
- खाद्य पदार्थ तळणाऱ्या गाड्यावर, दुकाने या आस्थापनांचा समावेश होता
- तेलाचे तापमान ६० अंश सेल्सिअसपेक्षा जास्त असणे आवश्यक आहे
- डब्यातून काढलेल्या तेलाचा ‘टीपीसी’ १५ युनिटपेक्षा जास्त नसावा

पालखी मार्गावरील तपासणी
- एकूण तपासणी केलेल्या आस्थापना : ४११
- तेलाच्या पुनर्रवापराबद्दलच्या तपासण्या : १०८
- पुनर्वापर होत असलेल्या तेलाचे घेतलेले नमुने : १
- पुनर्वापराचे जप्त केलेले तेलाची किंमत : ८६७ रुपये

Web Title: Todays Latest Marathi News Pne22m03981 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..