पुणे पीपल्स बँकेतर्फे १२ टक्के लाभांश | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पुणे पीपल्स बँकेतर्फे १२ टक्के लाभांश
पुणे पीपल्स बँकेतर्फे १२ टक्के लाभांश

पुणे पीपल्स बँकेतर्फे १२ टक्के लाभांश

sakal_logo
By

पुणे, ता. २० : ‘‘पुणे पीपल्स को-ऑप बँकेने नेत्रदीपक कामगिरी करत भागधारकांना १२ टक्के लाभांश जाहीर केला आहे, अशी माहिती बँकेचे अध्यक्ष अॅड. सुभाष मोहिते यांनी दिली.
बँकेची ७१वी वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच पार पडली. याप्रसंगी अॅड. मोहिते यांनी सभासदांसमोर वार्षिक ताळेबंद सादर केला. ते म्हणाले, ‘‘बँकेने यंदा २०७३ कोटी रुपयांचा व्यवसाय केला आहे. बॅंकेने १५.८९ कोटी रुपयांचा निव्वळ नफा मिळवला आहे. बँकेने सुमारे ७९९ कोटींची कर्जे दिली असून, राखीव निधी १६१.५६ कोटी आहे. तर, निव्वळ एनपीए १.९६ टक्के आहे.’’
सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल अॅड. मिलिंद भोई, अॅड. प्रताप परदेशी, शिरीष मोहिते, रायकुमार नहार आणि यशस्वी विद्यार्थ्यांचा संचालकांच्या हस्ते या वेळी सत्कार करण्यात आला. उपाध्यक्ष सुभाष गांधी, संचालक जनार्दन रणदिवे, बबनराव भेगडे, विजयकांत कोठारी, श्रीधर गायकवाड, सुभाष नडे, बिपिनकुमार शहा, डॉ. रमेश सोनावणे, अंबर चिंचवडे, मिलिंद वाणी, रमेश वाघ, मुख्य कार्यकारी अधिकारी सदानंद दीक्षित, व्यवस्थापन मंडळाचे सदस्य केरबा कदम, श्वेता ढमाळ यांच्यासह सर्व शाखांचे सभासद उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22m58481 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top