
बारावी निकाल ः राज्यातील ९४.२२ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण कोकण विभाग सगळ्यात भारी!
पुणे, ता. ८ : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत मार्च-एप्रिल २०२२मध्ये घेतलेल्या बारावीच्या परीक्षेत राज्यातील ९४.२२ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. राज्यातील नऊ विभागीय मंडळातून विज्ञान, कला, वाणिज्य आणि व्यवसाय अभ्यासक्रम शाखांमधील १४ लाख ४९ हजार ६६४ नियमित विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. त्यापैकी १४ लाख ३९ हजार ७३१ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली असून त्यातील १३ लाख ५६ हजार ६०४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. राज्यात कोकण विभागाचा ९७.२१ टक्के असा सर्वाधिक निकाल लागला. तर मुंबई विभागाचा ९०.९१ टक्के असा सर्वांत कमी निकाल आहे.
सर्व विभागीय मंडळातून नियमित विद्यार्थिनींचा निकाल ९५.३५ टक्के असून विद्यार्थ्यांचा निकाल ९३.२९ टक्के इतका आहे. विद्यार्थिनींच्या निकाल विद्यार्थ्यांपेक्षा २.०६ टक्क्यांनी जास्त आहे. राज्यात सर्व शाखांमधून ३५ हजार ३६८ पुनर्परीक्षार्थी विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली, त्यातील १८ हजार ७५५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून त्यांची एकूण निकालाची टक्केवारी ५३.०२ टक्के आहे. राज्यात सहा हजार ३३३ दिव्यांग विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती, त्यापैकी सहा हजार ३०१ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यातील ९५.२४ टक्के विद्यार्थी म्हणजेच सहा हजार एक विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तर राज्यात एकूण ३३ हजार २३८ खासगी विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली असून त्यातील २९ हजार १०६ (८७.५६ टक्के) विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
२०२० पेक्षा निकालात वाढ
फेब्रुवारी-मार्च २०२०मध्ये ९०.६६ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले होते. त्यानंतर २०२१मध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे बारावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला. त्यामुळे फेब्रुवारी-मार्च २०२०च्या तुलनेत यावर्षी निकाल ३.५६ टक्क्यांनी वाढला आहे.
निकालातील वैशिष्ट्ये
- एकूण १५३ विषयांपैकी तब्बल २४ विषयांचा निकाल १०० टक्के आहे.
- परीक्षेत एकूण २४५ गैरप्रकार आढळले
- एकूण पाच तोतया विद्यार्थी (डमी विद्यार्थी) आढळले, त्यातील मुंबईमध्ये चार आणि पुण्यात एक
- एकूण ४० तृतीयपंथी विद्यार्थ्यांनी दिली परीक्षा
- राज्यात एकूण १५८ विद्यार्थ्यांचे निकाल राखीव
- राज्यात शून्य टक्के निकाल असलेली कनिष्ठ महाविद्यालये : विज्ञान-८, कला-७, वाणिज्य-६
- १०० टक्के गुण मिळविणारा एकही विद्यार्थी यंदा नाही
शाखानिहाय निकाल
शाखा : नोंदणी केलेले विद्यार्थी : परीक्षा दिलेले विद्यार्थी : उत्तीर्ण विद्यार्थी : टक्केवारी
विज्ञान : ६,२४,८९८ : ६,२२,७४९ : ६,१२,२०८ : ९८.३० टक्के
कला : ४,२०,३९३ : ४,१५,१२९ : ३,७५,७४९ : ९०.५१ टक्के
वाणिज्य : ३,५५,६२४ : ३,५३,९५७ : ३,२४,६२९ : ९१.७१ टक्के
व्यवसायक अभ्यासक्रम : ४७,८२२ : ४६,९७३ : ४३,४०५ : ९२.४० टक्के
नियमित विद्यार्थ्यांचा एकत्रित निकाल
तपशील : मुले : मुली : एकूण
नोंदणी केलेले : ७,९१,६५४ : ६,५८,०१० : १४,४९,६६४
प्रविष्ट झालेले : ७,८६,४५५ : ६,५३,२७६ : १४,३९,७३१
उत्तीर्ण झालेले : ७,३३,६९९ : ६,२२,९०५ : १३,५६,६०४
उत्तीर्णतेची टक्केवारी : ९३.२९ टक्के : ९५.३५ टक्के : ९४.२२ टक्के
विभागीय मंडळनिहाय निकाल
विभागीय मंडळ : नोंदणी झालेले : प्रविष्ट झालेले : उत्तीर्ण झालेले : निकालाची टक्केवारी
पुणे : २,४४,३०८ : २,४२,४९६ : २,२७,०२२ : ९३.६१ टक्के
नागपूर : १,६०,०२८ : १,५९,१०६ : १,५३,५८४ : ९६.५२ टक्के
औरंगाबाद : १,६५,६१५ : १,६४,२६३ : १,५६,०१५ : ९४.९७ टक्के
मुंबई : ३,२५,२२० : ३,२३,५६३ : २,९४,१६४ : ९०.९१ टक्के
कोल्हापूर : १,२१,९२६ : १,२१,३४० : १,१५,३६२ : ९५.०७ टक्के
अमरावती : १,५१,२६२ : १,५०,११० : १,४४,६१८ : ९६.३४ टक्के
नाशिक : १,६१,५३९ : १,६०,६१० : १,५२,६२९ : ९५.०३ टक्के
लातूर : ९०,२२६ : ८८,८३० : ८४,६१५ : ९५.२५ टक्के
कोकण : २९,५४० : २९,४१३ : २८,५९५ : ९७.२१ टक्के
९० टक्के आणि त्यापेक्षा जास्त गुण मिळविलेले विद्यार्थी
पुणे : १,७३१
नागपूर : १,०४६
औरंगाबाद : ८१०
मुंबई : २,७६६
कोल्हापूर : ५९३
अमरावती : १,७८३
नाशिक : ६१२
लातूर : ५६३
कोकण : १३८
एकूण : १०,०४७
टक्केवारीनिहाय विद्यार्थ्यांची संख्या
टक्केवारी : एकूण विद्यार्थ्यांची संख्या
९० टक्के आणि त्यापेक्षा जास्त : १०,०४७
८५ ते ९० टक्क्यांपर्यंत : ३६,३७०
८० ते ८५ टक्क्यांपर्यंत : ७२,५७५
७५ ते ८० टक्क्यांपर्यंत : १,११,८६७
७० ते ७५ टक्क्यांपर्यंत : १,५१,८४३
६५ ते ७० टक्क्यांपर्यंत : १,८३,६९४
६० ते ६५ टक्क्यांपर्यंत : २,२३,६४६
४५ ते ६० टक्क्यांपर्यंत : ४,९४,४६६
४५ टक्क्यांपेक्षा कमी : ९०,८५१
Web Title: Todays Latest Marathi News Pne22m77622 Txt Pune Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..