चुकवू नये असे काही | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चुकवू नये असे काही
चुकवू नये असे काही

चुकवू नये असे काही

sakal_logo
By

चुकवू नये असे

१) ‘प्रतिमा उत्कट रंग कथा २२’
ज्ञान प्रबोधिनी प्रशाला माजी विद्यार्थी मंडळाच्या कला आणि संस्कृती विशेष उद्दिष्ट गटातर्फे ‘प्रतिमा उत्कट रंग कथा २२’ या चित्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. श्रीकांत प्रधान यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्‍घाटन होणार असून प्रदर्शनात सुमारे ७० कलाकारांच्या चित्रांचा समावेश आहे.
कधी ः गुरुवार (ता. ९) ते रविवार (ता. १०)
केव्हा ः सकाळी दहा ते रात्री आठ
कुठे ः राजा रविवर्मा कलादालन, घोले रस्ता

२) ‘कार्त दे विझीत’ चित्र प्रदर्शन
चित्रकार शुभदा सहस्रबुद्धे यांच्या ‘कार्त दे विझीत’ या चारकोल पेपरवरील पोट्रेट चित्रप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर, रवींद्रनाथ टागोर, लोकमान्य टिळक, सचिन तेंडुलकर, मधुबाला, श्रीदेवी, ओप्रा विन्फ्रे यांसारख्या प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वांची १२० चित्रे प्रदर्शनात मांडण्यात येणार आहेत.
कधी ः शुक्रवार (ता. १०) ते रविवार (ता. १२)
केव्हा ः सकाळी अकरा ते सायंकाळी सात
कुठे ः आर्ट टू डे आर्ट गॅलरी, भांडारकर इन्स्टिट्यूट रस्ता

३) संगीत संध्या
सवाई गंधर्व यांचे नातू आणि भारतरत्न पं. भीमसेन जोशी यांचे शिष्य पं. श्रीकांत देशपांडे यांच्या जयंतीनिमित्त ‘संगीत संध्या’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात पं. भीमसेन जोशी यांचे नातू विराज जोशी आणि किराणा घराण्याचे गायक पं. जयतीर्थ मेवुंडी यांचे गायन होणार आहे.
कधी ः शुक्रवार (ता. १०)
केव्हा ः सायंकाळी पाच वाजता
कुठे ः यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, कोथरूड

४) राजदत्त चित्रपट महोत्सव
ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्त यांच्या वयाच्या नव्वदीनिमित्त आणि चित्रपट कारकिर्दीच्या सुवर्णमहोत्सवानिमित्त ‘राजदत्त चित्रपट महोत्सवा’चे आयोजन केले आहे. या महोत्सवात ‘पुढचं पाऊल’, ‘वऱ्हाडी’, ‘वाजंत्री’, ‘शापित’ हे चित्रपट दाखवण्यात येणार आहेत. तसेच, खासदार विनय सहस्रबुद्धे यांच्या हस्ते आणि अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले व ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांच्या उपस्थितीत राजदत्त यांचा सत्कार करण्यात येणार आहे.
कधी ः शनिवार (ता. ११) व रविवार (ता. १२)
केव्हा ः सकाळी दहा वाजेपासून
कुठे ः राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय, विधी महाविद्यालय रस्ता

५) कलरलेस
भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाउंडेशनच्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत ‘डिफरंट स्ट्रोक्स’ प्रस्तुत ‘कलरलेस’ हा भरतनाट्यम, अभिनय आणि चित्रकलेचा एकत्रित आविष्कार असलेला प्रयोग सादर होणार आहे. या कार्यक्रमाची संकल्पना सुचेता जोशी यांची असून तेरा युवती यात सहभागी होणार आहेत.
कधी ः शनिवार (ता. ११)
केव्हा ः सायंकाळी सहा वाजता
कुठे ः भारतीय विद्या भवनचे सरदार महादेव बळवंत नातू सभागृह, सेनापती बापट रस्ता

६) पं. भीमसेन जोशी संगीत महोत्सव
कलाश्री संगीत मंडळ आणि द औंध सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष अभिजित गायकवाड यांच्यातर्फे नवव्या पं. भीमसेन जोशी संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवात डॉ. विकास कशाळकर, पं. श्रीनिवास जोशी, पं. अविराज तायडे, पं. हेमंत पेंडसे, नंदकिशोर ढोरे, मानसी कुलकर्णी, यज्ञेश रायकर, यशस्वी सरपोतदार, डॉ. पूर्वा शहा आदी कलाकारांचे सादरीकरण होणार आहे. महोत्सवाच्या अखेरच्या दिवशी अकोला येथील शास्त्रीय गायक डॉ. किशोर देशमुख यांना पं. भीमसेन जोशी पुरस्कार प्रदान केला जाईल.
कधी ः शनिवार (ता. ११) ते सोमवार (ता. १३)
केव्हा ः सायंकाळी पाच वाजता
कुठे ः पं. भीमसेन जोशी कलामंदिर, औंध

Web Title: Todays Latest Marathi News Pne22m77717 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top