‘एसआरएम’च्या विद्यार्थ्याला ॲमेझॉनचे एक कोटीचे पॅकेज | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘एसआरएम’च्या विद्यार्थ्याला ॲमेझॉनचे एक कोटीचे पॅकेज
‘एसआरएम’च्या विद्यार्थ्याला ॲमेझॉनचे एक कोटीचे पॅकेज

‘एसआरएम’च्या विद्यार्थ्याला ॲमेझॉनचे एक कोटीचे पॅकेज

sakal_logo
By

चेन्नई, ता. ८ : ॲमेझॉन जर्मनीतर्फे सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट या कामासाठी पुरंजय मोहन याची निवड करण्यात आली. पुरंजय एसआरएम इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजीचा शेवटच्या वर्षाचा विद्यार्थी आहे. त्याला कंपनीकडून वार्षिक एक कोटी रुपयांचे पॅकेज मिळाले आहे. विद्यार्थ्यांना मिळालेल्या हे आतापर्यंतचे सगळ्यात मोठे पॅकेज असल्याचे एसआरएमआयएसटीचे कुलगुरू सी. मुथामिझचेलावन यांनी सांगितले. या सर्वोत्तम यशाबद्दल पुरंजयला ‘नामांकित विद्यार्थी’ या पुरस्काराने सन्मानित केले.
संस्थेने २०२१-२२ या शैक्षणिक वर्षात आयोजित केलेल्या या रोजगार मेळाव्यादरम्यान एक हजाराहून अधिक कंपन्यांनी ‘एसआरएमआयएसटी’ला भेट दिली. १० हजारांहून अधिक विद्यार्थ्यांना रोजगारही मिळाला. या आधीही संस्थेतील दोन विद्यार्थ्यांना प्रत्येकी ५० लाख रुपयांचे पॅकेज मिळाले होते. परंतु, यावर्षी मिळालेले पॅकेज हे भारतातील कोणत्याही खासगी विद्यापीठात दिलेली सर्वोच्च ऑफर आहे. संस्थेतील आठ हजार विद्यार्थ्यांनी मागील वर्षी कॅम्पस प्लेसमेंट मिळाले होते, या वर्षी हा आकडा १० हजारांवर पोचला असून, पॅकेजची रक्कमही मोठ्या प्रमाणात वाढल्याचे संस्थेने स्पष्ट केले.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22m77844 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top