उड्डाणपूल, मेट्रोच्या खांबांच्या आराखड्याचे होणार फेरनियोजन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

उड्डाणपूल, मेट्रोच्या खांबांच्या आराखड्याचे होणार फेरनियोजन
उड्डाणपूल, मेट्रोच्या खांबांच्या आराखड्याचे होणार फेरनियोजन

उड्डाणपूल, मेट्रोच्या खांबांच्या आराखड्याचे होणार फेरनियोजन

sakal_logo
By

पुणे, ता. १० : वाहतुकीला अडथळा ठरू नये म्हणून पुणे विद्यापीठ चौकात उभारण्यात येणाऱ्या दुमजली उड्डाणपुलाचे, तसेच शिवाजीनगर स्टेशनजवळील आकाशवाणी चौकातील मेट्रोच्या खांबांचे (पिलर्स) आराखड्याचे फेरनियोजन करण्याचा निर्णय पुणे महापलिका आणि पीएमआरडीएने एकत्रितपणे घेतला. पुणे विद्यापीठ चौकात लॉगस्पॅन गर्डर (दोन खांबातील अंतर किमान ५० ते ७० मीटर) चा देखील विचार करण्यात यावा, अशी सूचना टाटा-सिमेन्स या कंपनीला यावेळी केली.
हिंजवडी ते शिवाजीनगर दरम्यान इलेव्हेटेड मेट्रो प्रकल्पाचे काम पीएमआरडीएने हाती घेतले आहे. त्यासाठी पुणे विद्यापीठ चौकात दुमजली उड्डाणपुलाचे नियोजन केले. या मेट्रो प्रकल्पाचे आराखडे पीएमआरडीएकडून नियोजन प्राधिकरण म्हणून महापालिकेला सादर केले होते. त्यामध्ये विद्यापीठ चौकात उभारण्यात येणाऱ्या दुमजली उड्डाणपुलाचा खांब चौकात मध्यभागी येत होता. तसेच आकाशवाणी चौकातही मेट्रो प्रकल्पाचा खांब मध्यभागी येत होता. हे खांब अडीच बाय अडीच मीटरचे असल्यामुळे त्यातून वाहतुकीला अडथळा निर्माण होऊ शकतो, असे निरीक्षण महापालिकेकडून नोंदविण्यात आले. त्यावर बुधवारी महापालिका आयुक्त विक्रम कुमार, पीएमआरडीएचे आयुक्त सुहास दिवसे, पुणे महानगर नियोजनकार विवेक खरवडकर, यांच्यासह टाटा-सिमेन्स या कंपनीचे अधिकारी यांनी पाहणी केली. त्यामध्ये हा निर्णय घेतला.

महापालिका, पीएमआरडीएच्या सूचना
मेट्रो प्रकल्पासाठी दोन खांबांमध्ये ३४ मीटरचे अंतर असते. विद्यापीठ चौकात दोन खांबातील अंतर जास्त कसे ठेवता येईल अथवा लॉगस्पॅन गर्डर उभारून हे अंतर ५० ते ७० मीटरपर्यंत करता येईल, यावर विचार करावा. त्यानुसार उड्डाणपुलाच्या आराखड्यात बदल करावा. तर आकाशवाणी चौकात खांबाच्या आकारात बदल करून वाहतुकीस कमी अडथळा होईल, असे डिझाईन करावे, अशा सूचना महापालिका आणि पीएमआरडीएने ठेकेदार कंपनीला दिल्या. संचेती पुलाजवळील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या हॉस्टेल जवळील खांबाच्या आराखड्यात बदल करावा, असेही यावेळी ठेकेदार कंपनीला सांगितले.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22m77870 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top