सिद्धु मुसेवाला खुन प्रकरणातील संशयित आरोपी संतोष जाधवच्या आईने मांडली कैफियत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सिद्धु मुसेवाला खुन प्रकरणातील संशयित आरोपी संतोष जाधवच्या आईने मांडली कैफियत
सिद्धु मुसेवाला खुन प्रकरणातील संशयित आरोपी संतोष जाधवच्या आईने मांडली कैफियत

सिद्धु मुसेवाला खुन प्रकरणातील संशयित आरोपी संतोष जाधवच्या आईने मांडली कैफियत

sakal_logo
By

संशयित आरोपी संतोष जाधवच्या आईने मांडली कैफियत

मंचर/पुणे, ता. ८ ः कामाच्या ठिकाणच्या व्यक्ती, नातेवाईक, ओळखीची माणसे अजूनही माझ्याशी तितक्‍याच आपुलकीने वागत आहेत, पण, रस्त्याने ये-जा करताना माझ्याकडे पाहून लोक कुजबूज करतात, एकमेकांना त्या संतोष जाधवची आई आहे, हे सांगत त्याचे व्हिडिओ दाखवतात, संशयी नजरेने पाहतात. अशा लोकांना रोखायचे तरी कसे ? अशी उद्विग्नता संगीता जाधव यांनी मांडत आपले मन मोकळे केले. ‘त्याने खरेच खून केला असेल, तर मी त्याला पाठीशी घालणार नाही. कायद्याने त्याला शिक्षा व्हायलाच पाहिजे, त्यानेही पोलिसांना शरण येऊन आपले निर्दोषत्व सिद्ध केले पाहिजे,’ असे भावनिक आवाहनही त्यांनी केले.

पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला यांच्या खून प्रकरणामधील संशयित संतोष जाधव व त्याचा साथीदार सौरभ महाकाळ यांची नावे पुढे आली. त्यानंतर पुणे ग्रामीण पोलिसांनी तत्काळ सौरभ महाकाळ ऊर्फ सिद्धेश कांबळे यास अटकही केली. मात्र ओंकार ऊर्फ राण्या बाणखेले खून प्रकरणात पुणे ग्रामीण पोलिस मागील वर्षापासून जाधवचा शोध घेत आहेत. त्यातच मुसेवाला खून प्रकरणात जाधवचे नाव पुढे आल्यानंतर सतर्क झालेल्या पोलिसांनी त्याचा आणखी शोध सुरू केला असला तरीही तो सापडलेला नाही. दरम्यान, संतोष जाधवच्या आईने आपल्या मुलाच्या अशा गुन्हेगारी वृत्तीचा समाचार घेतला आहे.
--------------
...आई म्हणून त्याने कधीच ऐकले नाही !
संतोष लहानपणापासून वाईट मुलांच्या संगतीत होता, भांडणे करीत. तेव्हा त्याला रागावर आवर घालण्यास सांगत होते. त्याच्या चुकांना कधी माफ केले नाही, पण त्यानेही आई म्हणून माझे कधी ऐकले नाही. ‘मी एक किलोमीटर चालत एका रुग्णालयात कामाला जाते. रस्त्याने ये-जा करताना लोक माझ्याकडे संशयी नजरेने बघतात. मोबाईलवर मुलाचे व्हिडिओ दाखवून माझ्या दिशेने खाणाखुणा करतात. हे कसे थांबवू ? हा मानसिक त्रास किती दिवस सहन करायचा, असा प्रश्‍नही त्यांनी उपस्थित केला.
-------

Web Title: Todays Latest Marathi News Pne22m77874 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top