झोपडीधारकांची थेट पंतप्रधानांकडे धाव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

झोपडीधारकांची थेट पंतप्रधानांकडे धाव
झोपडीधारकांची थेट पंतप्रधानांकडे धाव

झोपडीधारकांची थेट पंतप्रधानांकडे धाव

sakal_logo
By

पुणे, ता. ९ : स्मार्ट सिटी प्रकल्पाअंतर्गत सहा वर्षांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमीपूजन झाल्यानंतर अद्यापही औंध येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर झोपडपट्टीचे पुनर्वसन रखडले आहे. त्यामुळे पुनर्वसन प्रकल्प तातडीने मार्गी लावावा, यासाठी तेथील रहिवाशांनी थेट पंतप्रधानांकडेच दाद मागितली आहे.
औंध येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसाहतीत साधारण साडेतीनशे ते चारशे कुटुंबे राहतात. या वसाहतीचे पुनर्वसन स्मार्ट सिटी मिशन अंतर्गत करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते २५ जून २०१६ रोजी बालेवाडी येथे झालेल्या स्मार्ट सिटी मिशनच्या कार्यक्रमात १४ प्रकल्पांचे उद्‍घाटन किंवा भूमीपूजन करण्यात आले. यामध्ये या वसाहतीच्या पुनर्वसनाचाही समावेश होता. मात्र, या भूमीपूजनानंतर आजतागायत या प्रकल्पाचे कोणतेही काम झाले नसल्याचा दावा स्थानिक रहिवाशांनी केला आहे.
या संदर्भात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे रमेश ठोसर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निवेदन पाठवले आहे.‘ पंतप्रधानांच्या हस्ते ऑनलाइन पद्धतीने या प्रकल्पाचे भूमीपूजन झाले. त्यानंतर या प्रकल्पाची एकही वीट रचली गेली नाही. येथील रहिवाशांना विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. एकही झोपडीधारक बेघर न होता सर्वांना ५०० चौरस फुटांचे घर मिळावे, अशी सर्वांची अपेक्षा आहे. पंतप्रधान म्हणून आपण या प्रकरणाची दखल घेऊन हे झोपडपट्टी पुनर्वसन का रखडले आहे, याची चौकशी करून हे काम तातडीने सुरू करण्याचे आदेश द्यावेत,’असे या निवेदनात म्हटले आहे. असेच निवेदन ठोसर यांनी मुख्यमंत्री तसेच उपमुख्यमंत्र्यांनाही पाठवले आहे.

--

Web Title: Todays Latest Marathi News Pne22m77880 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top