पश्‍चिम महाराष्ट्रातील ७०५ महाविद्यालयांत ‘अभाविप’च्या शाखा अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त संकल्प ः देशभरात एक कोटी सदस्यांचे उद्दिष्ट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पश्‍चिम महाराष्ट्रातील ७०५ महाविद्यालयांत ‘अभाविप’च्या शाखा

अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त संकल्प ः देशभरात एक कोटी सदस्यांचे उद्दिष्ट
पश्‍चिम महाराष्ट्रातील ७०५ महाविद्यालयांत ‘अभाविप’च्या शाखा अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त संकल्प ः देशभरात एक कोटी सदस्यांचे उद्दिष्ट

पश्‍चिम महाराष्ट्रातील ७०५ महाविद्यालयांत ‘अभाविप’च्या शाखा अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त संकल्प ः देशभरात एक कोटी सदस्यांचे उद्दिष्ट

sakal_logo
By

पुणे, ता. १० ः ‘‘अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (एबीव्हीपी) लवकरच अमृतमहोत्सवी वर्षात पदार्पण करणार आहे. यानिमित्ताने पश्‍चिम महाराष्ट्रातील ७०५ महाविद्यालयांमध्ये ‘अभाविप’च्या शाखा स्थापन करण्याचा आणि देशभरातील सदस्यांची संख्या एक कोटी करण्याचे उद्दिष्ट निश्‍चित केले आहे,’’ अशी माहिती विद्यार्थी परिषदेच्या राष्ट्रीय मंत्री प्रेरणा पवार यांनी गुरुवारी (ता.९) पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले.

शिमला येथे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक झाली. या बैठकीचा समारोप २९ मे रोजी झाला. या पत्रकार परिषदेला प्रा. अनिल सहस्रबुद्धे, राष्टीय महामंत्री निधी त्रिपाठी, पश्‍चिम महाराष्ट्र प्रांतमंत्री अनिल ठोंबरे, पुणे महानगर मंत्री शुभंकर बाचल आदी उपस्थित होते.
राष्ट्रीय कार्यकारी परिषदेच्या बैठकीत शिक्षण क्षेत्रातील राज्य सरकारांचा अनैतिक हस्तक्षेप थांबवा, सध्याची राष्ट्रीय परिस्थिती, विद्यार्थी केंद्रित आणि भविष्याभिमुख राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, स्वावलंबी भारत बनवण्याच्या दिशेने तरुणांनी वाटचाल करावी, असे विविध चार प्रस्ताव मंजूर केले. कोरोना कालावधीनंतर आंतरराज्य विद्यार्थी जीवन दर्शन प्रकल्प पुन्हा सुरू करण्याबाबत चर्चा झाली. या प्रकल्पाद्वारे ईशान्येकडील राज्यांतील विद्यार्थ्यांना भारतातील विविध भागांना भेटी देऊन त्यांना भारतातील विविधतेची ओळख करून दिली जाते, असे यावेळी सांगण्यात आले.

नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाद्वारे भारतीय ज्ञान परंपरा नवीन पिढीपर्यंत पोहोचेल. प्राचीन काळात भारतीय अर्थव्यवस्था खूप मजबूत होती आणि आयुर्वेदासह विविध क्षेत्रात भारत अग्रेसर होता. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर सर्वच क्षेत्रात सातत्याने वाढ झाली आहे. आता प्रत्येक क्षेत्रात स्वावलंबी होण्यासाठी झपाट्याने प्रयत्न करावे लागतील. अभाविप ने ''उन्नत भारत'' सारख्या मोहिमेद्वारे देशातील तरुणांना स्वावलंबनाच्या मार्गावर नेण्यासाठी उल्लेखनीय प्रयत्न केले आहेत. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाची ज्या प्रकारे चर्चा करण्यात आली आहे, ती आपण यशस्वी करून राष्ट्रीय पुनर्निर्माणाचे उद्दिष्ट साध्य करू शकतो.
- प्रा. अनिल सहस्रबुद्धे

Web Title: Todays Latest Marathi News Pne22m78285 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top