दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने तरुणावर वार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने तरुणावर वार
दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने तरुणावर वार

दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने तरुणावर वार

sakal_logo
By

पुणे, ता. १० : दारू पिण्यासाठी पैशांची मागणी केल्यानंतर पैसे न दिल्याच्या रागातून एकाने तरुणावर तलवारीने वार करून त्याच्याजवळील तीन हजार रुपयांची रोकड काढून घेतली. या घटनेत तरुण गंभीर जखमी झाला. येरवडा पोलिसांनी संशयित आरोपीस अटक केली आहे. ही घटना गुरुवारी पहाटे नऊ वाजण्याच्या सुमारास येरवडा परिसरात घडली. अभिजित ऊर्फ चड्डीभैय्या रमेश शिंदे (वय १९, लक्ष्मीनगर, येरवडा) असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी माजीद शेख (वय २१, रा. येरवडा) यांनी येरवडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी माजीद हा मंडप व लग्नसोहळ्यात सजावटीचे काम करतो. नेहमीप्रमाणे तो गुरुवारी (ता.९) पहाटे चार वाजण्याच्या सुमारास मंडप लावण्याचे काम संपल्यानंतर येरवड्यातील लक्ष्मीनगर परिसरातून त्याच्या घरी जात होता. त्यावेळी अभिजित शिंदे याने फिर्यादीस अडविले. त्याने फिर्यादीकडे नशापाणी करण्यासाठी पैशांची मागणी केली. त्यास पैसे देण्यास फिर्यादीने नकार दिला. त्यावेळी त्याने फिर्यादीस शिवीगाळ केली. फिर्यादीस पैसे न दिल्यास जीवे मारण्याची धमकी देत, त्यांच्या पॅंटच्या खिशातील तीन हजार रुपयांची रक्कम जबरदस्तीने काढून घेतली. तेवढ्यावरच न थांबता त्याच्याकडील तलवारीने फिर्यादीच्या डोक्‍यात घाव घातले. तसेच त्यांना लाथाबुक्‍क्‍यांनी मारहाण केली. या घटनेत फिर्यादी गंभीर जखमी झाले. या प्रकरणाचा तपास पोलिस उपनिरीक्षक विशाल पाटील करीत आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22m78464 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top