धमकावून पैसे उकळणाऱ्या चौघांना अटक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

धमकावून पैसे उकळणाऱ्या चौघांना अटक
धमकावून पैसे उकळणाऱ्या चौघांना अटक

धमकावून पैसे उकळणाऱ्या चौघांना अटक

sakal_logo
By

पुणे, ता. १० : तरुणाला अडवून त्याकडे दारू पिण्यासाठी पैसे मागत त्याला कोयत्याचा धाक दाखवून लुटल्याप्रकरणी चौघांना सिंहगड रस्ता पोलिसांनी अटक केली. न्यायालयाने त्यांना १३ जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
साहिल परमेश्‍वर ढगे (वय २१), मयूर मोहन शिंदे (वय २३), शुभम श्रीकृष्ण सदाफुले (वय २१) आणि अंकित शिवाजी होटगिर (वय १९, सर्व रा. हिंगणे खुर्द) अशी अटक आरोपींची नावे आहेत. तर आणखी दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत सूरज संतोष ढवळे (वय १८, रा. हिंगणे) यांनी फिर्याद दिली. गुरुवारी (ता. ९) रात्री एकच्या सुमारास हिंगणे खुर्दमधील गणाधिश संकुल येथे हा प्रकार घडला. पुढील तपासासाठी आरोपींना पोलिस कोठडी देण्याची मागणी सरकारी वकील गिरीश बारगजे यांनी केली.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22m78500 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top