वकिलांनी लुटला मनमुराद हसण्याचा आनंद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वकिलांनी लुटला मनमुराद हसण्याचा आनंद
वकिलांनी लुटला मनमुराद हसण्याचा आनंद

वकिलांनी लुटला मनमुराद हसण्याचा आनंद

sakal_logo
By

पुणे, ता. १० : पुणे बार असोसिएशनतर्फे (पीबीए) शिवाजीनगर न्यायालयात आयोजित हास्यकलाकार मकरंद टिल्लू यांचा ‘हसण्यासाठी जगा व जगण्यासाठी हसा’ हा विनोदी कार्यक्रम पार पडला. यावेळी वकिलांनी मनमुराद हसण्याचा आनंद लुटला. ‘पीबीए’चे अध्यक्ष ॲड. पांडुरंग थोरवे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. त्यांनी वकिलांना रोजच्या कोर्ट कामाच्या धावपळीतुन स्वतःसाठी थोडासा वेळ काढून हसले पाहिजे व आनंदी राहून काम केले पाहिजे, असे सांगितले. याप्रसंगी विष्णू तापकीर, जयश्री काळे- पालवे, एकनाथ सुगावकर, गंधर्व कवडे, सोळंकी यांचा सन्मान असोसिएशनतर्फे करण्यात आला. कार्यक्रमास पुणे बार असोसिएशनच्या कार्यकारिणीमधील पदाधिकारी उपस्थित होते. सूत्रसंचालन ‘पीबीए’चे सचिव ॲड. अमोल शितोळे यांनी केले. कार्यकारिणी सदस्य ॲड. अजय नवले यांनी आभार मानले.
----------------------------

Web Title: Todays Latest Marathi News Pne22m78546 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top