‘सिंहगड’च्या डब्यांत चढताना प्रवासी पडले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘सिंहगड’च्या डब्यांत चढताना प्रवासी पडले
‘सिंहगड’च्या डब्यांत चढताना प्रवासी पडले

‘सिंहगड’च्या डब्यांत चढताना प्रवासी पडले

sakal_logo
By

पुणे, ता. १० ः सिंहगड एक्स्प्रेसमध्ये सीट मिळावी म्हणून फलाटावर गाडी दाखल होत असताना प्रवासी डब्यांत चढत असतानाच गर्दीमुळे ते खाली पडले. या घटनेत सात ते आठ प्रवासी जखमी झाले, तर यातील एक प्रवासी पुण्याच्या शासकीय रुग्णालयातील आयसीयू कक्षात दाखल झाला आहे. पिंपरी स्थानकावर ही घटना घडली आहे.

सिंहगड एक्स्प्रेसला पिंपरीसाठी डी-७ हा डबा राखीव केला आहे. मात्र, येथून प्रवास करणाऱ्याची संख्या ही सुमारे सातशे ते आठशे असते. त्यामुळे प्रवाशांना डब्यांत प्रवेश करणे हे अवघड जाते, त्यात सीट मिळणे तर खूप दुरापास्त आहे. पूर्वी सिंहगड एक्स्प्रेसला १६ प्रवासी डबे होते. प्रशासनाने आता त्यात दोन डब्यांची घट केली आहे. एकीकडे प्रवासी वाढत असताना, दुसरीकडे रेल्वे प्रशासनाने डब्यांची संख्या कमी केली आहे. त्यामुळे प्रवाशांना जीव मुठीत घेऊन मुंबई गाठावे लागत आहे. तर काही वेळा डब्यांत जागा मिळविणे यावरून प्रवाशांमध्ये हाणामारीचे प्रसंग उद्भवत आहेत. तेव्हा रेल्वे प्रशासनाने तत्काळ डब्यांच्या संख्येत वाढ करणे गरजेचे आहे.

प्रवासी क्षमता ११२, प्रत्यक्षात ८००
सेकंड सीटिंगच्या डब्यांत प्रवासी क्षमता ही ११२ची आहे. डब्यात प्रवासी दाटीवाटीने उभे राहून आणखी फार तर शंभर ते दोनशे प्रवासी प्रवास करू शकतील. मात्र, आठशे प्रवाशांसाठी हे खूप अवघड आहे. त्यामुळे अनेक प्रवासी जीव धोक्यात घालून गाडी फलाटावर येत असतानाच डब्यांत प्रवेश मिळविण्यासाठी प्रयत्न करतात, यातच प्रवासी जखमी झाले.

‘‘आम्ही अनेकदा रेल्वे प्रशासनाकडे डब्यांची संख्या वाढविण्याची मागणी केली आहे. मात्र, प्रशासन आमच्या मागणीकडे डोळेझाक करीत आहे. डब्यांत चढताना प्रवाशांच्या बाबतीत सातत्याने अपघात घडत आहेत. या घटनेत एक प्रवासी आयसीयूमध्ये दाखल झाला आहे. रेल्वे अजून कशाची वाट पाहत आहे?’’
- इक्बाल मुलाणी, अध्यक्ष, पिंपरी-चिंचवड रेल्वे प्रवासी संघ

Web Title: Todays Latest Marathi News Pne22m78616 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top