सात वाहनतळांसाठी नवे ठेकेदार नियुक्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सात वाहनतळांसाठी
नवे ठेकेदार नियुक्त
सात वाहनतळांसाठी नवे ठेकेदार नियुक्त

सात वाहनतळांसाठी नवे ठेकेदार नियुक्त

sakal_logo
By

पुणे, ता. १० ः पुणे महापालिकेचे सात वाहनतळ चालविण्यासाठी नवे ठेकेदार नियुक्त करण्यात आले असून, त्याचा प्रस्ताव महापालिका आयुक्त व प्रशासक विक्रम कुमार यांनी स्थायी समितीमध्ये मंजूर केले. तीन वर्षांसाठी हे ठेकेदार नेमलेले असून, यातून महापालिकेला प्रतिवर्षी अडीच कोटी रुपयांचे उत्पन्न मिळणार आहे.

महापालिकेचे शहरात ३० वाहनतळ आहे, यापूर्वी १० वाहनतळ ठेकेदारास चालविण्यासाठी देण्यात आले असून, उर्वरित २० वाहनतळांसाठी निविदा प्रक्रिया मागविण्यात आली होती. त्यापैकी सात वाहनतळांच्या निविदांना मंजुरी देण्यात आली.

पुणे स्टेशन येथील तुकारामशेठ शिंदे वाहनतळ येथील दुचाकी आणि चारचाकी वाहनतळाची स्वतंत्र निविदा मागविण्यात आली होती. दुचाकीसाठीची १ कोटी ८ लाख रुपयांची मे. शारदा सर्व्हिसेसची निविदा मंजूर केली, तर चारचाकी वाहनतळाची मे. डी. आर. सर्व्हिसेस या संस्थेची ८१ लाख रुपयांची निविदा मंजूर केली. गणेश पेठेतील अल्पना सिनेमासमोरील वाहनतळाची ४ लाख १० हजार रुपयांची अमित एन्टरप्राइजेसची, तर नारायण पेठेतील वाहनतळासाठीची कविता रामचंद्र मोरे यांची ६ लाख ४ हजार रुपयांची निविदा मंजूर केली. शुक्रवार पेठेतील भाऊ महाराज बोळातील पार्किंगची हिमाचल वेअर हाउसिंग प्रा.लि.ची १ लाख ८० हजार रुपयांची निविदा मंजूर करण्यात आली. फर्ग्युसन रस्त्यावरील मिलेनियम प्लाझा येथील २५ लाख १५ हजार रुपयांची निविदा मंजूर करण्यात आली, तर जंगली महाराज रस्त्यावरील पार्किंगसाठी पीबीपी ग्रुपने भरलेली २२ लाख ५२ हजार ८५५ रुपयांची निविदा मंजूर करण्यात आली आहे.
-------------------------

Web Title: Todays Latest Marathi News Pne22m78627 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top