विभागीय रेल्वे सल्लागार समिती सदस्यांच्या बैठकीत विविध मागण्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विभागीय रेल्वे सल्लागार समिती सदस्यांच्या बैठकीत विविध मागण्या
विभागीय रेल्वे सल्लागार समिती सदस्यांच्या बैठकीत विविध मागण्या

विभागीय रेल्वे सल्लागार समिती सदस्यांच्या बैठकीत विविध मागण्या

sakal_logo
By

पुणे, ता. १० : रेल्वे प्रवाशांच्या सोयीसाठी स्थानकांवर लिफ्ट बसविण्यात यावी. तसेच प्रवाशांचे बॅगा व अन्य काही वस्तू हरविल्यास त्याची तक्रार तसेच त्याचा शोध घेण्याची प्रक्रिया ऑनलाइन करावी, अशा विविध मागण्या निखिल काची यांनी विभागीय रेल्वे सल्लागार समिती सदस्याच्या बैठकीत केल्या. अध्यक्षस्थानी विभागीय रेल्वे व्यवस्थापक रेणू शर्मा यांची उपस्थिती होती.
बैठकीत रेल्वे प्रशासनाने सदस्यांच्या मागणीचा योग्य तो विचार केला जाईल, असे आश्वासन दिले. यावेळी सुनील मोदी, निखिल काची, गोपाल तिवारी, विनीत पाटील, सुरेश माने, बशीर सुतार, अप्पासाहेब शिंदे, अजित चौगुले, किशोर धोंडिराम बोरावत, शिवनाथ बिहाणी, दिलीप बटवाल आदी सदस्य उपस्थित होते. तसेच रेल्वेच्या वतीने अतिरिक्त विभागीय रेल्वे व्यवस्थापक बृजेश कुमार सिंह, प्रकाश उपाध्याय यांच्या सह वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक डॉ मिलिंद हिरवे आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22m78664 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top