स्टार्टअपची सुरुवात चक्क कचऱ्यातून! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

स्टार्टअपची सुरुवात चक्क कचऱ्यातून!
स्टार्टअपची सुरुवात चक्क कचऱ्यातून!

स्टार्टअपची सुरुवात चक्क कचऱ्यातून!

sakal_logo
By

पुणे, ता. १२ : कचऱ्यापासून खत, अगरबत्ती आणि असे इतरही काही उत्पादने तयार केल्याचे आपण ऐकतो. मात्र आता केवळ खत किंवा अगरबत्तीवर न थांबता पुण्यातील एका स्टार्टअपने प्लास्टिक आणि ओल्या व सुक्या कचऱ्यापासून जनरेटरसाठी लागणारे डिझेल, बॉयलरसाठी वापरता येणारा ग्रीन कोळसा (प्युअल पॅलेट) आणि विविध रंग तयार करण्याची किमया साधली आहे.
पुण्यात सध्या दररोज हजार किलो कचरा निर्माण होत आहे. हा कचरा टाकायचा कुठे असा प्रश्‍न नेहमी प्रशासनाला पडतो. त्यामुळे कचऱ्याच्या व्यवस्थापनाचा प्रश्‍न गंभीर बनत चालला आहे. या प्रश्‍नाला स्टार्टअपने व्यवसायाचे रुप देत वाढत असलेल्या इंधन दरवाढीवर देखील उपाय शोधला आहे. तसेच पर्यावरणाची हानी होणार नाही असा पद्धतीने उत्पादने तयार करून निसर्गाचे देखील हानी टाळली आहे. २०१४ पासून सरकारने स्वच्छ भारतवर लक्ष केंद्रित केले आहे. त्यामुळे सर्व प्रकारच्या कचऱ्यापासून आपण काय करू शकतो याचा विचार अजित गाडगीळ आणि अभिजित दातार यांनी सुरू केला. या विचारांना व्यापक स्वरूप देत त्यांनी कचऱ्यापासून विविध उत्पादन सुरू करण्याचे ‘जीडी इनव्हारोमेंटल प्रा.लि.’ हे स्टार्टअप २०१४ मध्ये स्थापन केले. त्यांचे पहिलेच उत्पादन थेट कुवेतला निर्यात झाले. त्यानंतर त्यांनी प्लाटिकपासूनचे उत्पादने बनविण्याचे काम सुरू केले.
कचऱ्यावर प्रयोग करीत असताना त्यांनी जनरेटरला लागणारे डिझेल बनवले. तसेच बाय प्रॉडक्ट म्हणून लस्टर पेंट देखील तयार करायला सुरवात केली. त्यानंतर वीज आणि ओल्या कचऱ्यापासून बॉयलरला लागणारा ग्रीन कोळसा (प्युअल पॅलेट) देखील हे स्टार्टअप तयार करीत आहे. विशेष म्हणजे स्टार्टअपने तयार केलेले डिझेल आता कारसाठी वापरण्याचे प्रयोग सुरू झाले आहे. हे डिझेल कारसाठी वापरण्यास परवानगी मिळविण्याची प्रक्रिया स्टार्टअपने सुरू केली आहे. तसे झाल्यास कमी किमतीत डिझेल उपलब्ध होणार आहे. कारण सध्या डिझेल ९५ रुपये प्रतिलिटर असताना स्टार्टअपने तयार केलेले डिझेल ७४ रुपये प्रतिलिटरने उपलब्ध होऊ शकते.

अठराव्या वर्षी स्थापन केली कंपनी
गाडगीळ यांनी बीइ इंडस्ट्रिअल इंजिनिअरिंग आणि डिप्लामो इन प्रॉडक्शन केला आहे. गेल्या तीस वर्षांपासून ते इंडस्ट्रीमध्ये कार्यरत आहेत. त्यांनी
१८ व्या वर्षी पहिली कंपनी सुरू केली होती. टाक्यांमधील पाण्याची पातळी मोजण्याची यंत्रे, ट्रान्सफॉरमधील ऑइल फिल्टर आणि कृषी उत्पादनांसाठी लागणारे यंत्रे त्यांनी विकसित करण्यात मोठा हातभार लावला होता. तर दातार यांचा हॉटेल व्यवसाय असून स्टार्टअपमधील कायदेशीर बाबींची जबाबदारी त्यांच्याकडे आहे.

वेस्ट टुरिझमचा मानस
कचरा आहे, अशा ठिकाणी व्यवसाय सुरू करण्यास किंवा राहण्यास कोणाचीही पसंती नसते. त्यामुळे आपण त्यावर प्रक्रिया करून त्यापासून येणारी दुर्गंधी कमी केली व त्याचा उपयुक्तता वाढवली तर त्याचे अनेक फायदे आहेत. त्यातून वेस्ट टुरिझम देखील होवू शकते. शहरातील बड्या सोसायटीमध्ये कचऱ्यापासून उत्पादने बनविण्याचे प्रकल्प सुरू झाले तर तेथील नागरिकांना शाश्‍वत उत्पादन मिळतील, असे गाडगीळ यांनी सांगितले.

स्टार्टअपची वैशिष्ट्ये
- कचऱ्यापासून जनरेटरसाठी डिझेलची निर्मिती
- बॉयलरसाठी वापरता येणारा ग्रीन कोळसा बनवला
- त्यातील राखेपासून वीट तयार करता येते
- विविध रंग तयार करण्याची किमया साधली
- वार्षिक उलाढाल एक कोटीचा घरात


आमचे उत्पादन वाढवून कचऱ्याचे निर्मुलन करायचे आहे. प्रकल्पाची संख्या वाढली तर अनेकांना वीज व डिझेल मिळेल. तसेच मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होर्इल. या सर्व प्रवासात सरकारची मदत अपेक्षित आहे. आत्तापर्यंत आम्ही हे सर्व उत्पादन प्रायोगिक तत्त्वावर केले आहे. येत्या काळात मोठ्या प्रमाणात उत्पादन तयार करण्यात येणार आहे.
- अजित गाडगीळ, सहसंस्थापक, जी. डी. इनव्हारोमेंटल प्रा.लि.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22m78714 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top