आपत्ती व्यवस्थापनाच्या आराखड्याची प्रतीक्षा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आपत्ती व्यवस्थापनाच्या आराखड्याची प्रतीक्षा
आपत्ती व्यवस्थापनाच्या आराखड्याची प्रतीक्षा

आपत्ती व्यवस्थापनाच्या आराखड्याची प्रतीक्षा

sakal_logo
By

पुणे, ता. ११ : महापालिकेच्या कोणत्या विभागाकडे कोणती जबाबदारी आहे, त्या संबंधित जबाबदार अधिकारी कोण? त्यांचे संपर्क क्रमांक, शहरातील धोकादायक ठिकाणे याची माहिती असणारा आपत्तीच्या काळात नागरिकांना उपयुक्त असणारा आराखडा महापालिकेने अद्याप प्रकाशित केला नाही. दरवर्षी एक जूनरोजी हा आराखडा प्रकाशित केला जातो. पण जून महिन्याचे १० दिवस उलटून गेले तरी हा आराखडा अद्याप छपाईचेच काम सुरूच आहे. त्यामुळे आपत्ती व्यवस्थापनाचा आराखडा केव्हा जाहीर होणार याची प्रतीक्षा पुणेकरांना लागली आहे.

नागरिकांना आपत्ती व्यवस्थापन कक्षाचा संपर्क क्रमांकच माहिती नसल्याने मदतीचा भार अग्निशामक दलावर येत आहे. गेल्या काही वर्षांपासून कमी वेळात जास्त पाऊस पडण्याचे प्रमाण वाढत आहे, त्यामुळे पाणी तुंबणे, घरात पाणी घुसणे, झाड पडणे अशा घटना घडत आहेत. नागरिकांना तत्काळ मदत मिळावी यासाठी प्रत्येक क्षेत्रीय कार्यालय स्तरावर आपत्ती व्यवस्थापन कक्ष स्थापन केले जातात. पण यंदा हे कक्ष स्थापन झालेले नाहीत व नागरिकांना संपर्क क्रमांकही दिलेले नाहीत. महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी पालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाला क्षेत्रीय कार्यालयातील कक्ष कार्यान्वित करण्याचे आदेश दिले होते. तरीही त्यानुसार कार्यवाही झालेली नाही.  
आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार केला असून, तो छपाईसाठी दिलेला आहे. येत्या सोमवारी उपलब्ध होईल, अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त सचिन इथापे यांनी दिली.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22m78867 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top