सुरक्षेच्या नावाखाली प्रवाशांची अडवणूक पुणे विमानतळावरील प्रकार; पंतप्रधान कार्यालयाकडे तक्रार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सुरक्षेच्या नावाखाली 
प्रवाशांची अडवणूक
पुणे विमानतळावरील प्रकार; पंतप्रधान कार्यालयाकडे तक्रार
सुरक्षेच्या नावाखाली प्रवाशांची अडवणूक पुणे विमानतळावरील प्रकार; पंतप्रधान कार्यालयाकडे तक्रार

सुरक्षेच्या नावाखाली प्रवाशांची अडवणूक पुणे विमानतळावरील प्रकार; पंतप्रधान कार्यालयाकडे तक्रार

sakal_logo
By

पुणे, ता. ११ : मागील दोन दिवसांत पुणे विमानतळावर प्रवाशांना
सुरक्षा तपासणीच्या (सेक्युरिटी चेक) नावाखाली तासनतास रांगेत थांबावे लागले. विमानतळ प्रशासनाचे ढिसाळ नियोजन व ‘सीआयएसएफ’च्या कामकाजाबाबत प्रवाशांनी नाराजी व्यक्त केले आहे.
विविध कारणांमुळे विमानतळावर प्रवाशांना गैरसोयीचा सामना करावा लागतो! कधी विमानांचे उड्डाण उशिराने होते, तर कधी ‘बेल्ट’मुळे प्रवाशांना बॅग मिळण्यास उशीर होतो. त्यातच सुरक्षा तपासणीच्या कारणावरून गेल्या दोन दिवसांपासून प्रवाशांची गैरसोय होत आहे. प्रवासी अजय कुमार यांनी पंतप्रधान कार्यालय व ‘डीजीसीए’कडे पुणे विमानतळांवरील ‘सेक्युरिटी चेक’च्या नावाखाली प्रवाशांची अडवणूक होत असल्याची तक्रार केली आहे. यात त्यांनी दोनशेहून अधिक प्रवाशांना ताटकळत थांबविण्यात आल्याचे नमूद केले आहे. यापूर्वी देखील काही प्रवाशांना असाच अनुभव आला होता. मात्र, याची फारशी दखल विमानतळ प्रशासन घेत नसल्याचे दिसून येत आहे. या संदर्भात ‘सीआयसीएफ’च्या बाजू जाणून घेण्यासाठी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता प्रतिसाद मिळाला नाही.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22m78992 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top