
कुटुंब नियोजनात पुरुषांचा सहभाग वाढण्यासाठी शस्त्रक्रिया शिबिर
पुणे, ता. ११ : कुटुंब नियोजनात पुरुषांचा सहभाग वाढण्यासाठी फॅमिली प्लॅनिंग असोसिएशन ऑफ इंडिया, पुणे शाखेतर्फे १७ आणि १८ जून रोजी विनामूल्य पुरुष नसबंदी शस्त्रक्रिया शिबिर आयोजित केली आहे. या शिबिरासाठी नावनोंदणी करावी, असे आवाहन असोसिएशनच्या पुणे शाखेच्या अध्यक्ष अॅड. अवलोकिता माने, व्यवस्थापक प्रवीण सोनवणे यांनी केले आहे. विनामूल्य नोंदणीसाठी ८८८८३८६८८६ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा. फॅमिली प्लॅनिंग असोसिएशन, वेस्टर्न कोर्ट, गणेशखिंड (ई-स्क्वेअर थिएटरसमोर) पुणे येथे शिबिर होईल. सात मिनीट वेळेची ही शस्त्रक्रिया असून, अर्धा तास आराम केल्यास दैनंदिन कामे करता येतात. पुरुष नसबंदी केलेल्या व्यक्तीस संस्थेकडून पाच हजार रुपये आणि ११०० रुपये सरकारी अनुदान देण्यात येते. तसेच, पुरुष नसबंदीसाठी तयार केलेल्या दूत व्यक्तीस संस्थेकडून एक हजार रुपये; तर दोनशे रुपये सरकारी अनुदान देण्यात येणार आहे. आधारकार्डची प्रत, बँक पासबुकच्या पहिल्या पानाची प्रत घेऊन यावे, असे आवाहन केले आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Pne22m78998 Txt Pune Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..