काश्मिरींना संविधानिक अधिकार हवेत ‘अपनी पार्टी’चे अध्यक्ष अल्ताफ बुखारी यांचे मत; हिंसाचाराच्या घटना दुर्दैवी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

काश्मिरींना संविधानिक अधिकार हवेत
‘अपनी पार्टी’चे अध्यक्ष अल्ताफ बुखारी यांचे मत; हिंसाचाराच्या घटना दुर्दैवी
काश्मिरींना संविधानिक अधिकार हवेत ‘अपनी पार्टी’चे अध्यक्ष अल्ताफ बुखारी यांचे मत; हिंसाचाराच्या घटना दुर्दैवी

काश्मिरींना संविधानिक अधिकार हवेत ‘अपनी पार्टी’चे अध्यक्ष अल्ताफ बुखारी यांचे मत; हिंसाचाराच्या घटना दुर्दैवी

sakal_logo
By

पुणे, ता. १२ : ‘‘कलम ३७० काढल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये हिंसाचाराच्या घटना जरी कमी झाल्या असल्या, तरी आमची विशेष ओळखच पुसली गेली आहे. तेव्हापासून आजपर्यंत आमच्याकडे लोकनियुक्त सरकार नाही. निवडणूका केव्हा होणार, या बद्दल अनभिज्ञता आहे. जम्मू काश्मीरमध्ये लोकशाही प्रक्रिया राबवत नागरिकांना तातडीने संविधानिक अधिकार मिळायला हवे,’’ असे मत ‘जम्मू काश्मीर अपनी पार्टी’चे अध्यक्ष सैयद मोहम्मद अल्ताफ बुखारी यांनी व्यक्त केले.

सरहद संस्थेने आयोजित केलेल्या जम्मू काश्मीर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवानिमित्त पुण्यात आलेल्या बुखारी यांनी पत्रकारांशी संवाद साधला. नवी पेठेतील पुणे श्रमिक पत्रकार संघाच्यावतीने आयोजित केलेल्या वार्तालापाला रफी अहमद मीर, पत्रकार संघाचे सरचिटणीस डॉ. सुजित तांबडे आदी उपस्थित होते.

बुखारी म्हणाले, ‘‘कलम ३७० पुनर्स्थापित केले जाईल, यासाठी आमचा न्यायालयावर विश्वास आहे. काश्मीरमध्ये सध्या घडलेल्या हिंसाचाराच्या घटना दुर्दैवी असून, पंडितांशिवाय काश्मीर अपूर्ण आहे. आम्हाला लोकशाही, शांतता आणि सुरक्षा नांदवायची आहे. काश्मिरी पंडितांनी खोऱ्यामध्ये परत यावे.’’ द कश्मीर फाईल्स हा चित्रपट व्यावसायिक असून, त्यामध्ये पूर्ण सत्य दाखविण्यात आलेले नसल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले.

बुखारी म्हणाले...
-देशातील इतर राज्याप्रमाणेच काश्मीरमधील स्थिती, केवळ वृत्त वाहिन्यांच्या ‘टीआरपी’मुळे जास्त नकारात्मक चित्रण
- काश्मीरमधील पंडितांसंबंधीच्या घटना दुर्दैवी, परंतु धार्मिक विद्वेशाची स्थिती नाही

उद्योजकांची भेट..
पुणे दौऱ्यावर असलेल्या बुखारींनी पुणे शहरातील चित्रपट निर्माते, पर्यटन उद्योजक आदींची भेट घेतली. जम्मू-काश्मीरमधील उद्योगांना चालना मिळावी, तसेच चित्रीकरणाचा उद्योग पुन्हा वाढावा म्हणून त्यांनी उद्योजकांशी यासंबंधी चर्चा केली.

चित्रपट महोत्सवात आज चर्चासत्र
काश्मीर आणि चित्रपट या विषयावर चित्रपट महोत्सवात विशेष चर्चासत्राचे आयोजन केले आहे. विधी महाविद्यालय रस्त्यावरील राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाच्या सभागृहात सोमवारी (ता.१३) सकाळी साडेदहा वाजता हे चर्चासत्र होणार आहे. यात ‘सकाळ’चे संपादक संचालक डॉ. श्रीराम पवार, ‘लोकमत’चे संपादक संजय आवटे, ‘महाराष्ट्र टाईम्स’चे निवासी संपादक श्रीधर लोणी सहभागी होणार आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22m79086 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top