
‘आत्मभान हरपल्याशिवाय खरे काव्य स्फुरत नाही’
पुणे, ता. १२ ः ‘काव्य हे स्वतःच्या जीवनाचे प्रतिबिंब असते. देहभान, आत्मभान हरपल्याशिवाय खरे काव्य स्फुरत नाही. मनातील भाव, सूक्ष्म निरीक्षण, भवतालाशी एकरूपता आणि संवेदनशील मन चांगल्या काव्याची निर्मिती करते’, असे मत शिवचरित्रकार विजय देशमुख यांनी व्यक्त केले.
जागर भक्ती-शक्तीचा एंटरप्राइजेस, स्वरप्रभा फाउंडेशन, आर्ट ऑफ लिव्हिंग, व्हीनस स्पिरिच्युअल ॲण्ड हीलिंग कम्युनिटी ट्रस्ट आणि बिलिओ एफएक्स यांच्यातर्फे आयोजित ‘जागर भक्ती-शक्तीचा’ या कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी ‘जागर भक्ती-शक्तीचा’ या ध्वनिमुद्रिकेचे प्रकाशन व प्रत्यक्ष सादरीकरण, तसेच ‘गंध अंतरीचे’ या काव्यसंग्रहाचे प्रकाशन झाले. याप्रसंगी कवयित्री डॉ. संगीता बर्वे, अल्बमचे निर्माते कवी-गीतकार मंगेश निरवणे, ‘व्हीनस ट्रस्ट’चे शिरीष काकडे, अरुण बाभुळगावकर, सिरम इन्स्टिट्यूटचे उमेश कुलकर्णी, आर्ट ऑफ लिव्हिंगचे शेखर मुंदडा, राजय शास्तारे, प्रकाशक रूपाली अवचरे आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन पूजा थिगळे यांनी केले. संदीप तापकीर यांनी प्रास्ताविक केले व आभार मानले.
Web Title: Todays Latest Marathi News Pne22m79138 Txt Pune Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..