‘पीएमपी’कडून विद्यार्थ्यांसाठी पास | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘पीएमपी’कडून विद्यार्थ्यांसाठी पास
‘पीएमपी’कडून विद्यार्थ्यांसाठी पास

‘पीएमपी’कडून विद्यार्थ्यांसाठी पास

sakal_logo
By

पुणे, ता. १२ ः पुणे महापालिकेच्या हद्दीतील प्राथमिक, माध्यमिक व खासगी शाळेतील विद्यार्थ्यांकरिता पीएमपीकडून २०२२–२०२३ करिता अनुदानित पासेसचे वितरण सुरु करण्यात आले आहे.
पीएमपीकडून चालू शैक्षणिक वर्षाकरिता विद्यार्थ्यांना पुणे मनपा अनुदानित बस पास वितरणाची योजना सुरु झाली आहे. त्यासाठी १० जूनपासून अर्जांचे वाटप सुरु झाले आहे. पीएमपीच्या सर्व आगारांत व सर्व पास केंद्रांवर अर्जाचे वाटप सुरु आहे. शैक्षणिक संस्था व त्यांच्या प्रतिनिधींनी शाळेकडील विद्यार्थ्यांचे एकत्रित अर्ज आणल्यास त्या शैक्षणिक संस्थेस एकत्रित पास दिले जातील.
खासगी शाळेतील विद्यार्थ्यांनी कागदपत्रांची तपासणी झाल्यावर पासची २५ टक्के रक्कम चलनान्वये बँक ऑफ महाराष्ट्राच्या कोणत्याही शाखेमध्ये भरणा केल्यानंतर अर्ज, चलन व कागदपत्रे जवळच्या आगारामध्ये सादर केल्यावर पास मिळू शकेल. तसेच सदरच्या पासेसची वितरण व्यवस्था १० जूनपासून महामंडळाच्या सर्व आगारांमधून सुरु झाली असल्याची माहिती पीएमपी प्रशासनाने दिली.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22m79220 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top