‘औद्योगिक जगतामध्ये संशोधनवृत्ती गरजेची’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘औद्योगिक जगतामध्ये 
संशोधनवृत्ती गरजेची’
‘औद्योगिक जगतामध्ये संशोधनवृत्ती गरजेची’

‘औद्योगिक जगतामध्ये संशोधनवृत्ती गरजेची’

sakal_logo
By

पुणे, ता. १३ ः ‘तंत्रज्ञान आणि प्रश्नांचे स्वरूप सातत्याने बदलत असते. औद्योगिक जगतात काळाच्या बरोबरीने धावायचे असल्यास संशोधनवृत्ती अंगी असणे गरजेचे असते’, असे मत ‘प्राज इंडस्ट्रीज’चे संस्थापक-अध्यक्ष डॉ. प्रमोद चौधरी यांनी व्यक्त केले.

जयंत देव लिखित आणि ग्रंथाली प्रकाशनातर्फे प्रकाशित ‘युक्तीच्या गोष्टी सांगणाऱ्यांची गोष्ट’ या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभात ते बोलत होते. याप्रसंगी प्रयास एनर्जी समुहाचे समूह समन्वयक शंतनू दीक्षित, ग्रंथाली प्रकाशन संस्थेचे विश्र्वस्त सुदेश हिंगलासपूरकर, ग्रंथीली प्रकाशन संस्थेच्या धनश्री धारप आदी उपस्थित होते. लेखक जयंत देव यांनी त्यांचा अनुभवपट यावेळी मनोगताद्वारे उलगडला. सुदेश हिंगलासपूरकर यांनी ग्रंथालीच्या कार्याची माहिती विशद करताना भविष्यकालीन योजनांचीही माहिती दिली. पुस्तकातील निवडक भागाचे संज्ञा कुलकर्णी यांनी अभिवाचन केले. मिलिंद बावा यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22m79466 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top