
पैसे न दिल्याने मुलाचा आईवर कोयत्याने वार
पुणे, ता. १४ ः कोकणात फिरायला जाण्यासाठी पैसे न दिल्याच्या रागातून मुलाने आईच्या डोक्यात कोयत्याने वार केला, ही घटना वडगाव शेरी परिसरात घडली. यामध्ये आई गंभीर जखमी झाली आहे. याप्रकरणी येरवडा पोलिसांनी मुलाला अटक केली.
ईश्वर प्रकाश गलांडे (वय ३८, रा. नवरत्न सोसायटी, वडगाव शेरी) असे अटक केलेल्या मुलाचे नाव आहे, तर या घटनेत नंदा प्रकाश गलांडे (वय ६६) या जखमी झाल्या असून, त्यांनी येरवडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. ईश्वरला त्याच्या मित्रांसमवेत कोकणामध्ये फिरायला जायचे होते, त्यासाठी त्याने आईकडे पैसे मागितले होते. मात्र, आईने त्यास पैसे देण्यास नकार दिला होता. त्याचा राग आल्याने त्याने आईला शिवीगाळ करून मारहाण केली. तसेच, घरात ठेवलेल्या कोयत्याने आईच्या डोक्यात वार केले. या घटनेत नंदा गलांडे या गंभीर जखमी झाल्या असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
Web Title: Todays Latest Marathi News Pne22m79586 Txt Pune Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..