आदिवासी विभागाच्या विविध योजनांचा आढावा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आदिवासी विभागाच्या 
विविध योजनांचा आढावा
आदिवासी विभागाच्या विविध योजनांचा आढावा

आदिवासी विभागाच्या विविध योजनांचा आढावा

sakal_logo
By

पुणे, ता. १४ : ‘‘केंद्र सरकारच्या योजनांचा लाभ आदिवासी समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे. त्यासाठी आदिवासी विभागाच्या प्रकल्प अधिकाऱ्यांनी प्रयत्न करणे आवश्यक आहे,’’ असे प्रतिपादन आदिवासी विकास विभागाचे सचिव डॉ. अनुपकुमार यादव यांनी केले.

महाराष्ट्र राज्य आदिवासी विकास विभागाची आढावा बैठक ‘यशदा’ येथे पार पडली. या वेळी ते बोलत होते. आदिवासी संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेच्यावतीने आयोजित केलेल्या या बैठकीत आदिम जमाती विकास योजना, विशेष केंद्रीय साहाय्य योजना, वनबंधू कल्याण योजना आणि वनधन योजनेचा आढावा घेण्यात आला.

डॉ. यादव म्हणाले, ‘‘आदिवासी कल्याणासाठी योजनांच्या अंमलबजावणीसाठी भरघोस निधी उपलब्ध करून दिला आहे. योजना यशस्वी होण्यासाठी प्रकल्प अधिकाऱ्यांनी सरकार आणि आदिवासी समाज यांच्यातील दुआ बनणे आवश्यक आहे.’’ आदिवासी संशोधन आणि प्रशिक्षण संस्थचे आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड यांनी योजनांची माहिती दिली. आदिवासी विकास विभाग नाशिकचे आयुक्त हिरालाल सोनवणे यांनी विभागातर्फे राज्यात राबविण्यात येत असलेल्या योजनांचा आढावा घेतला. आदिवासी विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक दीपक सिंघल यांनी शबरी घरकुल योजनेची यशस्वी अंमलबजावणी केली जात असल्याचे सांगितले. या वेळी विभागाच्या कॉफी टेबल बुकचे प्रकाशन करण्यात आले.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22m79652 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top