वसुंधरा जिओ टेक्नॉलॉजीचा ‘विवाटेक’मध्ये सहभाग | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वसुंधरा जिओ टेक्नॉलॉजीचा ‘विवाटेक’मध्ये सहभाग
वसुंधरा जिओ टेक्नॉलॉजीचा ‘विवाटेक’मध्ये सहभाग

वसुंधरा जिओ टेक्नॉलॉजीचा ‘विवाटेक’मध्ये सहभाग

sakal_logo
By

पुणे, ता. १४ : सॅटेलाइटवरून आलेल्या डेटाचे ॲडव्हान्स मशिन लर्गिंन आणि आर्टिफिशल इंटेलिजन्सच्या (एआय) मदतीने विश्‍लेषण करून त्या आधारे जलद आणि अचूक डेटा निर्माण करणाऱ्या ‘वसुंधरा जिओ टेक्नॉलॉजी’ला (Vasundharaa Geo Technologies) पॅरिसमध्ये होत असलेल्या ‘विवाटेक’मध्ये (Vivatech २०२२) स्पेस ॲप्लिकेशन्स विभागात प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली आहे.

१५ ते १८ जून या काळात पॅरिसमध्ये ही परिषद होणार आहे. ही परिषद म्हणजे जगातील सगळ्यात मोठी स्टार्टअप आणि तंत्रज्ञानावर होणारा परिसंवाद आहे. यंदाच्या ‘विवाटेक’मध्ये देशाला ‘स्टार्टअप कंट्री ऑफ द इअर’चा सन्मान मिळाला आहे. त्या अंतर्गत भारताकडून एक शिष्टमंडळ परिषदेत देशाचे प्रतिनिधित्व करेल. या शिष्टमंडळाचे नेतृत्व देशाचे आयटी मंत्री अश्विनी वैष्णव करतील. त्यांच्याबरोबर १०० हून अधिक अधिकारी असतील. ‘वसुंधरा जिओ टेक्नॉलॉजीज’तर्फे त्यांच्या प्रमुख उत्पादन विकसक शर्वरी नागराज परिषदेत सहभागी होणार आहेत.

मॅपिंग करण्यासाठी उपग्रह, एरिअल प्लॅटफॉर्म, फील्ड सेन्सर यावरून डेटा घेतला जातो. त्यानंतर त्याचे एआय वापरून विश्लेषण वसुंधरा तयार करते. वसुंधराने विकसित केलेल्या अर्बन टेक्नॉलॉजीमधील नवकल्पना आणि उपायांचे सादरीकरण या परिषदेत होणार आहे. एखाद्या शहरात किती इमारती वाढल्या? शहर कसे वाढले? शहरात झाडे किती, तेथील रस्ते किती? यासह विविध प्रकारचे मॅपिंग या स्टार्टअपमुळे सोपे झाले आहे. अद्वैत कुलकर्णी, आदित्य टेकाळे आणि राजेंद्र मनोहर हे तीन संचालक या स्टार्टअपचे नेतृत्व करीत आहेत. एरोस्पेस एव्हियोनिक्सचे शिक्षण घेऊन कुलकर्णी यांनी २०१७ साली या स्टार्टअपची सुरुवात केली. परिषदेत अत्याधुनिक डिजिटल सोल्यूशन्स, स्थानिक ई-मोबिलिटी, ड्रोन्स, टिकाऊ तंत्रज्ञान, तसेच एआय ॲप्लिकेशन्स किंवा कटिंग एज स्टार्टअपला देशातर्फे प्रदर्शित करण्यात येणार आहे.

विवाटेकमध्ये गुगल, फेसबुक यासारख्या आघाडीच्या कंपन्यांबरोबर सहभाग घेत देशाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळणे ही वसुंधरासाठी मानाची आणि आनंदाची बाब आहे. या परिषदेच्या माध्यमातून देशातील स्टार्टअपना अनोखे महत्त्व प्राप्त होणार आहे. तसेच त्यात सहभागी झालेल्या स्टार्टअपला आणखी संधीदेखील मिळतील.
- अद्वैत कुलकर्णी, संस्थापक, वसुंधरा जिओ टेक्नॉलॉजी

Web Title: Todays Latest Marathi News Pne22m79773 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top