‘आरटीओ’च्या रक्तदान शिबिराला प्रतिसाद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘आरटीओ’च्या रक्तदान शिबिराला प्रतिसाद
‘आरटीओ’च्या रक्तदान शिबिराला प्रतिसाद

‘आरटीओ’च्या रक्तदान शिबिराला प्रतिसाद

sakal_logo
By

पुणे, ता. १४ : प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे महाराष्ट्र गुप्तवार्ता प्रबोधिनी येथे रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. प्रशिक्षणार्थी सहायक मोटार वाहन निरीक्षक व महाराष्ट्र गुप्तवार्ता प्रबोधिनी येथील एकूण ६९ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी या वेळी रक्तदान केले. प्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ. अजित शिंदे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजीव भोर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी युवराज पाटील यांनी जबाबदारी पार पाडली. सेवानिवृत्त मोटार वाहन निरिक्षक जितेंद्र उपगन्लावार, गुप्तवार्ता प्रबोधिनी येथील प्रभारी संचालक पोलिस उपअधीक्षक सुधाकर यादव, पोलिस निरीक्षक सागर गरुड, राजेश भागवत, रवींद्र चव्हाण, नीलेश जगदाळे, पोलिस उपनिरीक्षक लक्ष्मण कोरडे व कवायत प्रशिक्षक रूपेश काळे आदी अधिकारी उपस्थित होते. ससून रक्तपेढीचे समाजसेवा अधीक्षक शरद देसले यांचे यासाठी सहकार्य लाभले.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22m79862 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top