देवल अभिवादन सोहळा यंदाही रद्दच | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

देवल अभिवादन सोहळा यंदाही रद्दच
देवल अभिवादन सोहळा यंदाही रद्दच

देवल अभिवादन सोहळा यंदाही रद्दच

sakal_logo
By

पुणे, ता. १४ : अखिल भारतीय नाट्य परिषदेतर्फे दरवर्षी १४ जून रोजी घेण्यात येणारा नाट्याचार्य गोविंद बल्लाळ देवल अभिवादन सोहळा सलग तिसऱ्या वर्षी रद्द झाला आहे. मंगळवारी (१४ जून) हा सोहळा न झाल्याने सलग तिसऱ्या वर्षी रंगकर्मी पुरस्कारापासून वंचित राहिले आहेत.

संगीत रंगभूमीवरील श्रेष्ठ नाटककार म्हणून गो. ब. देवल ओळखले जातात. दरवर्षी नाट्य परिषदेच्या मध्यवर्ती शाखेतर्फे एका रंगकर्मीचा पुरस्कार प्रदान करून गौरव केला जातो. गेली दोन वर्षे कोरोनाच्या संसर्गामुळे हा कार्यक्रम होऊ शकला नाही. यंदा कोरोनाचे निर्बंध नसले तरी नाट्य परिषद पदाधिकाऱ्यांचा वाद न्यायालयामध्ये असल्याने या वर्षीही देवल स्मृतिदिन साजरा झाला नाही. नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रसाद कांबळी की नरेश गाडेकर, या बाबतचा निर्णय अद्याप प्रलंबित आहे. त्यामुळेच देवल स्मृतिदिनाचा कार्यक्रम होऊ शकत नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

परिषदेच्या अध्यक्षपदाच्या निर्णयावरून वाद सुरू असून, त्याचा निर्णय न्यायालयाकडून येणे प्रलंबित आहे. त्यामुळे कार्यकारिणीच्या आणि नियामक मंडळाच्या बैठकाही होत नाहीत. याच कारणाने यंदाच्या कार्यक्रमाच्या आयोजनाबाबत आणि पुरस्काराबाबत चर्चा झाली नाही.
- दीपक रेगे, कार्यकारिणी सदस्य, अखिल भारतीय नाट्य परिषद, मध्यवर्ती शाखा

Web Title: Todays Latest Marathi News Pne22m79915 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top