बलात्कारप्रकरणी एकास अटक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बलात्कारप्रकरणी एकास अटक
बलात्कारप्रकरणी एकास अटक

बलात्कारप्रकरणी एकास अटक

sakal_logo
By

पुणे, ता. १४ : बलात्कार करून जबरदस्तीने गर्भपात करण्यास भाग पाडून लग्नाचा तगादा लावला तसेच अश्लील व्हीडिओ व्हायरल करण्याची धमकी दिल्याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी एकाला अटक केली. न्यायालयाने त्याला १७ जूनपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला. दीपककुमार चौधरी-जयस्वाल (वय २२) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. या बाबत २२ वर्षीय तरुणीने फिर्याद दिली आहे. २० नोव्हेंबर २०२१ रोजी दुपारी कात्रज परिसरात ही घटना घडली. चौधरी याने फिर्यादीवर बलात्कार केला. त्यातून त्या गर्भवती राहिल्यानंतर चार फेब्रुवारी २०२२ रोजी त्यांचा जबरदस्तीने गर्भपात केला. तसेच लग्न करण्यासाठी जबरदस्ती केली तर फिर्यादीचे अश्लील व्हीडिओ व्हायरल करण्याची धमकी त्याने दिली, असे फिर्यादीत म्हटले आहे. गुन्ह्याच्या पुढील तपासासाठी आरोपीला पोलिस कोठडी देण्याची मागणी सरकारी वकील वर्षाराणी जाधव यांनी केली आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22m79924 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top