
‘लष्कर ए तोएबा’च्या संपर्कातील एकास काश्मीरमधून अटक
पुणे, ता. १४ ः ‘लष्कर ए तोयबा’ या दहशतवादी संघटनेच्या संपर्कात असलेल्या आणखी एकास राज्य दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) काश्मीरमधून अटक केली. त्यामुळे आत्तापर्यंत ‘एटीएस’ने अटक केलेल्या संशयितांची संख्या चारवर पोचली आहे.
युसूफ (रा. जम्मू व काश्मीर) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. जुनैद महंमद (वय २८, सध्या रा. दापोडी, मूळ रा. गोंधनपूर, खामगाव, बुलडाणा) यास दापोडीतुन, तर त्याचा साथीदार आफताब हुसेन अब्दुल जब्बार शाह (वय २८, रा. किश्तवाड, जम्मू-काश्मीर) या दोघांना ‘एटीएस’ने यापूर्वी अटक केली होती. त्यापाठोपाठ इनामूल हक (रा. उत्तरप्रदेश) यालाही नुकत्याच बेड्या ठोकल्या होत्या. त्यानंतर आता युसूफलाही अटक केली.
जम्मू-काश्मीरमधील एका दहशतवादी संघटनेशी संबंधित हमीउदल्ला जरगर (रा. कुलगाव, जम्मू- काश्मीर) याने त्याच्या व्हॉटसअप ग्रुपवर राष्ट्रविरोधी व दहशतवादासंबंधी मजकूर टाकून तो सदस्यांना ग्रुपमधील इतर सदस्यांना त्यामध्ये सहभागी होण्यास उद्युक्त करीत होता. जुनैद त्याच्या संपर्कात आला होता. तत्पूर्वी ‘एटीएस’ने जुनैदला अटक केली. काही जणांनी जुनैदच्या बॅंक खात्यामध्ये टाकलेल्या पैशातूनच त्याने शस्त्र व मोबाईल खरेदी केले होते. तसेच बनावट फेसबुक खाते तयार करून तरुणांची भरती करण्याचा प्रयत्न तो करीत होता. त्याच्याकडील माहितीवरूनच पोलिसांनी इनामूल आणि त्यापाठोपाठ युसुफला काश्मीरमधून अटक केली.
Web Title: Todays Latest Marathi News Pne22m79933 Txt Pune Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..