
‘पीएमआरडीए’कडून लवकरच ३७ गावांच्या हरकतींवर सुनावणी
पुणे, ता. १४ : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) प्रारूप विकास आराखड्यातील तळेगाव विकसन केंद्रातील ३६ गावांतील हरकतींवर सुनावणी घेण्याचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार येत्या २० ते २७ जूनदरम्यान या हरकतींवर आकुर्डी येथील कार्यालयात सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत सुनावणी होणार असल्याची माहिती उपजिल्हाधिकारी रामदास जगताप यांनी दिली.
आंबी, वराळे, बधलवाडी, जांभूळ, सांगवी, नाणोली तर्फे चाकण, मेंढेवाडी, आंबळे, जाधववाडी, कल्हाट, निगडे, पवळेवाडी, आकुर्डी या गावांची २० जून रोजी सुनावणी घेतली जाणार आहे. खडकाळे, साते, नवलाख उंब्रे, कान्हे, नायगाव, कुसगाव खु., अहिरवडे, मोहितेवाडी, चिखलसे, पारवाडी, ब्राम्हणवाडी (साते) या गावांची २२ जून रोजी सुनावणी होणार आहे. कामशेत, ओझर्डे, करूंज, आढे खु. सदवली, ब्राम्हणवाडी, बऊर या गावांमधील हरकतींवर २३ जून रोजी सुनावणी होणार आहे. तळेगाव दाभाडे, उर्से, सोमाटणे, माळवाडी, परंदवाडी, नाणोली एन.एम या गावांची सुनावणी २७ जून रोजी घेतली जाईल. हरकती दाखल केलेल्या नागरिकांनी सुनावणीसाठी नियोजित वेळेत उपस्थित राहण्याचे आवाहनही जगताप यांनी केले आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Pne22m79939 Txt Pune Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..