जुनैदच्या बँक खात्यात पैसे पाठविणारा जेरबंद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जुनैदच्या बँक खात्यात
पैसे पाठविणारा जेरबंद
जुनैदच्या बँक खात्यात पैसे पाठविणारा जेरबंद

जुनैदच्या बँक खात्यात पैसे पाठविणारा जेरबंद

sakal_logo
By

पुणे, ता. १४ : लष्कर-ए-तैयबा या दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याच्या संशयावरून दापोडीतून अटक केलेल्या जुनैदच्या बँक खात्यात दहा हजार रुपये पाठविणाऱ्या तरुणास राज्य दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) जम्मू-काश्मीरमधून अटक केली. पुण्यातील विशेष न्यायालयाने त्याला २१ जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
मोहम्मद युसूफ मोहम्मद शाबान अत्तू (वय ३१, रा. पोस्ट दलयोग, उधियानपूर, जि. डोंडा, जम्मू-काश्मीर) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. त्याच्याविरोधात मुंबईतील काळाचौकी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

देशात घातपाती कारवाया घडविण्यासाठी लष्कर-ए-तैयबा दहशतवादी संघटनेत भरती आणि टेरर फंडिंगच्या संशयावरून एटीएसने यापूर्वी जुनैद महंमद अता महंमद (वय २८, रा. दापोडी, मूळ रा. गोंधनपूर, जि. बुलडाणा), आफताब हुसैन अब्दुल जब्बार शाह (वय २८, रा. किश्तवाड, जम्मू-काश्मीर), इनामूल हक ऊर्फ इनामूल इम्तियाज (वय १९, रा. पाटणा, गिरीदिह, झारखंड, सध्या रा. देवबंद, सहारनपूर, उत्तर प्रदेश) यांना अटक करण्यात आली आहे, तर आणखी दोघा आरोपींचा शोध घेतला जात आहे.

या प्रकरणातील मुख्य आरोपीने मोहम्मद मार्फत जुनैदच्या बँक खात्यात दहा हजार रुपये पाठविले आहेत. हे पैसे कशासाठी पाठविले, मुख्य आरोपी आणि मोहम्मदमध्ये काय संबंध आहेत, याचा तपास करण्यासाठी आरोपीची पोलिस कोठडीत चौकशी करण्याची आवश्यकता आहे, असे एटीएसतर्फे न्यायालयात सांगण्यात आले. बचाव पक्षाचे म्हणणे ऐकून घेतल्यावर न्यायालयाने आरोपी मोहम्मदला सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. या प्रकरणात जम्मू-काश्मीरमधील किश्तवाड येथून अटक केलेल्या आफताब हुसैन शाहच्या पोलिस कोठडीत विशेष न्यायालयाने दोन दिवसांची वाढ केली. या प्रकरणाचा तपास निर्णायक स्थितीत आहे, असे एटीएसने न्यायालयात सांगितले.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22m79973 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top