धायरीत तरुणावर शस्त्राने वार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

धायरीत तरुणावर शस्त्राने वार
धायरीत तरुणावर शस्त्राने वार

धायरीत तरुणावर शस्त्राने वार

sakal_logo
By

पुणे, ता. १५ : सिंहगड रस्ता परिसरातील धायरी भागात पूर्ववैमनस्यातून टोळक्याने दहशत माजवून एका तरुणावर शस्त्राने वार केल्याची घटना मंगळवारी (ता. १४) घडली. टोळक्याने परिसरातील वाहनांची तोडफोड केली.
या घटनेत गजानन राठोड (वय २९, रा. धायरी) जखमी झाला असून त्याने याबाबत सिंहगड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या प्रकरणी टोळक्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राठोड धायरीतील चव्हाण आळीतून जात होता. त्या वेळी टोळक्याने त्याला अडवले. टोळक्यातील एका आरोपीशी राठोडचे भांडण झाले होते. त्यावेळच्या वादातून टोळक्याने राठोडवर कोयत्याने वार केले. परिसरातील दुचाकींची तोडफोड करून टोळके पसार झाले. पोलिस उपनिरीक्षक चेतन थोरबोले या गुन्ह्याचा तपास करीत आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22m80074 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top