चुकवू नये असे काही | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चुकवू नये असे काही
चुकवू नये असे काही

चुकवू नये असे काही

sakal_logo
By

१) लघुपट महोत्सव
अविरत कलामंचतर्फे लघुपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवात ‘द ब्रिंजल कट-आउट हा हिंदी लघुपट आणि ‘चेक’ व ‘एक घास’ हा मराठी लघुपट दाखवण्यात येणार आहे.
कधी ः शुक्रवार (ता. १७)
केव्हा ः सायंकाळी सहा ते आठ
कुठे ः राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय, विधी महाविद्यालय रस्ता

२) पुस्तक प्रकाशन
इंद्रायणी साहित्य प्रकाशनातर्फे अरुण काकतकर लिखित ‘(घ)बाड’ या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यावेळी उपस्थित राहणार आहेत.
कधी ः शुक्रवार (ता. १७)
केव्हा ः सायंकाळी ६.३० वाजता
कुठे ः मनोहर मंगल कार्यालय, एरंडवणे

३) ‘स्वातंत्र्याचा क्रांतियज्ञ’ महानाट्य
शिक्षण प्रसारक मंडळी आणि स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव समारोह समिती, पुणे महानगर यांच्यातर्फे ‘स्वातंत्र्याचा क्रांतियज्ञ’ या महानाट्याचे आयोजन करण्यात आले आहे. इतिहास प्रेमी मंडळातर्फे सादर होणाऱ्या या नाटकांचे लेखन व दिग्दर्शन मोहन शेटे यांचे असून सुमारे १२५ कलावंतांचा चमू हे नाटक सादर करणार आहे.
कधी ः शनिवार (ता. १८)
केव्हा ः सायंकाळी ५.३० वाजता
कुठे ः स. प. महाविद्यालय मैदान, टिळक रस्ता

४) ‘स्वर धरोहर’
भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाउंडेशनच्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत शास्त्रीय संगीताच्या विविध प्रकारांचे सादरीकरण असलेल्या ‘स्वर धरोहर’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. संगीताचार्य डॉ. रेवा नातू यांचे वीस शिष्य व शिष्या यात सहभागी होणार आहेत.
कधी ः शनिवार (ता. १८)
केव्हा ः सायंकाळी सहा वाजता
कुठे ः भारतीय विद्या भवनचे सरदार महादेव बळवंत नातू सभागृह, सेनापती बापट रस्ता

Web Title: Todays Latest Marathi News Pne22m80138 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top