जनकल्याण रक्तपेढीचा गौरव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जनकल्याण रक्तपेढीचा गौरव
जनकल्याण रक्तपेढीचा गौरव

जनकल्याण रक्तपेढीचा गौरव

sakal_logo
By

पुणे : शहरातील जनकल्याण रक्तपेढीला राज्य रक्त संक्रमण परिषदेतर्फे पुरस्कार प्रदान करण्यात आला. कोरोनाच्या भयंकर उद्रेकातही मोठ्या प्रमाणात रक्तसंकलन करून सर्वोत्कृष्ट सेवेबद्दल जागतिक रक्तदाता दिनानिमित्ताने या रक्तपेढीला गौरविण्यात आले. हा पुरस्कार जनकल्याण रक्तपेढीतर्फे वरिष्ठ अधिकारी डॉ. रमेश कांबळे, रवींद्र कुलकर्णी, संतोष अनगोळकर यांनी स्वीकारला. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण करण्यात आले. या कार्यक्रमात ९९ पेक्षा जास्त व्यक्ती व संस्थांचा सन्मान करण्यात आला. राज्यात ७६ सरकारी आणि इतर ३०० रक्तपेढ्या आहेत. त्यापैकी चांगले रक्तसंकलनात भरीव योगदान करणाऱ्या शासकीय आणि अशासकीय अशा प्रत्येकी सहा रक्तपेढ्यांचा गौरव करण्यात आला.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22m80157 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top