​पावसाळी गटारांच्या स्वच्छतेचा दावा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

​पावसाळी गटारांच्या स्वच्छतेचा दावा
​पावसाळी गटारांच्या स्वच्छतेचा दावा

​पावसाळी गटारांच्या स्वच्छतेचा दावा

sakal_logo
By

पुणे, ता. १५ ः पुणे शहरात गेल्या आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे रस्त्यावर पाणी तुंबून दाणादाण उडालेली असताना शहरातील तब्बल १ लाख ७५ हजार मीटरच्या पावसाळी गटारांची स्वच्छता झाली आहे, तर ९० टक्क्यांपेक्षा जास्त छोट्या व मोठ्या चेंबर्सची स्वच्छता झाली असल्याचा दावा महापालिका प्रशासनाने केला आहे.
पुणे महापालिकेने पावसाळ्यापूर्वीची कामे करण्यासाठी प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयनिहाय नाले सफाई व पावसाळी गटार सफाईसाठी सुमारे १५ कोटींपेक्षा जास्त रकमेच्या निविदा काढल्या होत्या. पावसाळी गटरांची स्वच्छता केल्याने शहरातील रस्त्यांवर पाणी साचणार नाही, पाण्याचा निचरा लगेच होईल असे महापालिका प्रशासनाकडून केला होता. पण गेल्या आठवड्यात शहरात अवघ्या एका तासात ३२ मिलिमीटर पाऊस झाल्याने शहराच्या अनेक भागात पाणी तुंबले होते. यानंतर महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी शहरातील काही ठिकाणी जाऊन कामाची पाहणी केली. आयुक्त विक्रम कुमार यांनी पाचही परिमंडळाच्या अधिकाऱ्याची बैठक घेऊन पावसाळी गटारांच्या स्वच्छतेवरून चांगलीच झाडाझडती घेतली आहे. ज्या भागात पाणी साचले आहे, तेथे पुन्हा एकदा व्यवस्थित काम करा, असा आदेश दिला आहे.

प्रशासनाच्या माहितीनुसार...
- पावसामुळे पाणी तुंबल्यामुळे धोकादायक ठरणारी सर्व ८६ ठिकाणांची स्वच्छता
- एक लाख ७० हजार मीटर्स पावसाळी वाहिन्यांची स्वच्छता
- १२ मीटरपेक्षा मोठ्या रस्त्यावरील पावसाळी गटारांवरील ९७ टक्के चेंबर व ५२ टक्के वाहिन्यांची सफाई पूर्ण
- १२ मीटरपेक्षा कमी रस्त्यावरील पावसाळी गटारांवरील ९० टक्के चेंबर व ७५ टक्के वाहिन्यांची साफसफाई पूर्ण

मेट्रोच्या मार्गाखालील दुभाजकांमुळे पाण्याचा निचरा होण्यासाठी जागा नसल्याने पाणी तुंबले होते. हे पाणी वाहून जाण्यासाठी वाट करून द्यावी असे मेट्रोला सांगण्यात आले आहे. पाणी पुरवठा, मलःनिसारण विभागातर्फे पावसाळ्यात देखील काम सुरू असेल, पण काम झाल्यानंतर त्वरित रस्ता पूर्ववत करावा असे आदेश दिलेले आहेत.
- डॉ. कुणाल खेमणार, अतिरिक्त आयुक्त, पुणे महापालिका

Web Title: Todays Latest Marathi News Pne22m80319 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top