व्हीनस कलामहोत्सव आजपासून | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

व्हीनस कलामहोत्सव आजपासून
व्हीनस कलामहोत्सव आजपासून

व्हीनस कलामहोत्सव आजपासून

sakal_logo
By

पुणे, ता. १६ : व्हीनस ट्रेडर्सतर्फे आयोजित ‘व्हीनस कलामहोत्सवा’ला आजपासून (ता. १७) सुरुवात होणार आहे. शुक्रवार (ता. १७) ते रविवार (ता. १९) या कालावधीत घोले रस्त्यावरील राजा रवी वर्मा आर्ट गॅलरी येथे सकाळी अकरा ते रात्री आठ या वेळेत हा महोत्सव विनामूल्य खुला असणार आहे.

महोत्सवाचे उद्‍घाटन अभिनेते गिरीश कुलकर्णी यांच्या हस्ते होणार असून, या वेळी चित्रकार डॉ. सुधाकर चव्हाण, डॉ. सुभाष पवार, प्रमोद कांबळे यांचा सत्कार करण्यात येणार आहे. तसेच रिजनल कॅमेल आर्ट फाउंडेशन’तर्फे घेण्यात आलेल्या स्पर्धेतील विजेते सुरभी गुळविलकर आणि रूपेश सोनार यांना बक्षीस दिले जाणार आहे. महोत्सवात शुक्रवारी (ता. १७) सायंकाळी पाच वाजता मनोहर देसाई यांचे ‘कॅलिग्राफी पेंटिंग’ विषयक आणि शनिवारी (ता. १८) सायंकाळी ५.३० वाजता विलास कुलकर्णी यांचे जलरंगावरील प्रात्यक्षिक सादर होईल. तर रविवारी (ता. १९) सकाळी अकरा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत लहान मुलांसाठी घनश्याम देशमुख यांची चित्रकला कार्यशाळा होणार आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22m80598 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top