
‘प्रशासक राज’मध्ये ८० टक्के निविदा मंजूर
पुणे, ता. १६ : महापालिकेवर ‘प्रशासक राज’ आल्यानंतर गेल्या तीन महिन्यांत ६४७ कामांना मंजुरी दिली आहे. त्यापैकी सुमारे ८० टक्के म्हणजेच ५०० कामांच्या निविदा मार्गी लागल्या आहेत. या अंतर्गत सुमारे ३५० ते ४०० कोटी रुपयांची देखभाल, दुरुस्तीची कामे केली जाणार आहेत.
महापालिकेत गेल्या १५ मार्चपासून आयुक्त विक्रम कुमार यांची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. आयुक्तांनी मांडलेल्या अंदाजपत्रकाची अंमलबजावणी केली जात आहेत. त्यानुसार पुढील वर्षभर केल्या जाणाऱ्या देखभाल, दुरुस्तीच्या कामाच्या निविदांना मंजुरी दिली जात आहे. गेल्या १ एप्रिलपासून ६४७ विकासकामांना वित्तीय समितीने मंजुरी दिली आहे. त्यापैकी ४०० निविदा या अंतिम टप्प्यात आहेत. तर उर्वरित १०० निविदांची प्रक्रिया सुरू आहे.
डिसेंबरमध्ये प्रकल्पांच्या निविदा?
आयुक्त विक्रम कुमार म्हणाले, ‘‘सध्या देखभाल दुरुस्तीच्या निविदांना मान्यता दिली जात आहे. नव्या प्रकल्पासाठी ‘डीपीआर’चे काम सध्या सुरू आहे. त्यामुळे हे प्रकल्प मंजुरीसाठी येत्या नोव्हेंबर-डिसेंबरपर्यंतचा कालावधी लागू शकतो. लगेच नवे प्रकल्प येऊ शकणार नाहीत.
Web Title: Todays Latest Marathi News Pne22m80695 Txt Pune Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..