दहावी निकाल : यंदा ९६.९४ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण राज्यात कोकण विभाग अव्वल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दहावी निकाल : यंदा ९६.९४ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण
राज्यात कोकण विभाग अव्वल
दहावी निकाल : यंदा ९६.९४ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण राज्यात कोकण विभाग अव्वल

दहावी निकाल : यंदा ९६.९४ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण राज्यात कोकण विभाग अव्वल

sakal_logo
By

दहावी निकाल : यंदा ९६.९४ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण
राज्यात कोकण विभाग अव्वल
पुणे, ता. १७ : कोरोनामुळे गेली दोन वर्षे ऑनलाइन शिक्षण घेऊनही दहावीची (ऑफलाइन) परीक्षा दिलेल्या राज्यातील एकूण १५ लाख ६८ हजार ९७७ नियमित विद्यार्थ्यांपैकी तब्बल १५ लाख २१ हजार ३ विद्यार्थी (९६.९४ टक्के) उत्तीर्ण झाले आहेत. राज्यात १२२ विद्यार्थ्यांना १०० टक्के गुण मिळाले असून ८३ हजार ६० विद्यार्थ्यांना ९० टक्के आणि त्यापेक्षा अधिक गुण मिळाले आहेत.
कोकण विभागाचा निकाल (९९.२७ टक्के) सर्वाधिक लागला असून सर्वात कमी निकाल (९५.९० टक्के) नाशिक विभागाचा लागला आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च-एप्रिल २०२२ मध्ये घेतलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल शुक्रवारी जाहीर झाला. या परीक्षेसाठी एकूण १५ लाख ८४ हजार ७९० नियमित विद्यार्थ्यांनी नोंद केली होती. त्यातील १५ लाख ६८ हजार ९७७ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. नऊ विभागीय मंडळामधून एकूण ५४ हजार १५९ पुनर्परीक्षार्थी विद्यार्थ्यांनी नोंद केली होती. त्यातील ५२ हजार ३५१ विद्यार्थी परीक्षेला होते. त्यापैकी ४१ हजार ३९० विद्यार्थी (७९.०६ टक्के) उत्तीर्ण झाले असल्याची माहिती राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर २०२१ मध्ये अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे दहावीचा निकाल जाहीर केला होता. त्या वेळी ९५.३० टक्के निकाल लागला होता. या तुलनेत यंदाचा निकाल १.६४ टक्क्यांनी जास्त आहे. राज्यात २१ हजार ५३० खासगी विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. त्यातील २० हजार ५९८ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली असून त्यापैकी १७ हजार ३५१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले (८४.२३ टक्के) आहेत. सर्वोत्तम पाच (बेस्ट फाइव्ह) विषयांचे गुण आणि टक्केवारी गुणपत्रिकेत दर्शविण्यात आली आहे.

*दिव्यांग विद्यार्थ्यांचा निकाल ९४.४० टक्के*
- राज्यात आठ हजार २९ दिव्यांग विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यापैकी सात हजार ५७९ विद्यार्थी (९४.४० टक्के) उत्तीर्ण झाले आहेत.

*मुलींची टक्केवारी मुलांपेक्षा जास्त*
- मुलींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ९७.९६ टक्के असून मुलांच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ९६.०६ टक्के आहे. यंदाही मुलींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी मुलांपेक्षा १.९० टक्क्यांनी जास्त आहे.

*निकालाची वैशिष्ट्ये :*
- २४ विषयांचा निकाल १०० टक्के
- १२,२१० शाळांचा निकाल १०० टक्के
- १५ विद्यार्थ्यांचे निकाल ठेवले राखून

*विभागीय मंडळ : उत्तीर्णतेची टक्केवारी (नियमित विद्यार्थी)*
पुणे : ९६.९६
नागपूर : ९७
औरंगाबाद : ९६.३३
मुंबई : ९६.९४
कोल्हापूर : ९८.५०
अमरावती : ९६.८१
नाशिक : ९५.९०
लातूर : ९७.२७
कोकण : ९९.२७
(नोट : बार चार्ट करणे)

*नियमित व पुनर्परीक्षार्थी विद्यार्थी :*
तपशील : मुले : मुली : एकूण
-परीक्षा दिलेले : ८,७९,१६८ : ७,४२,१७५ : १६,२१,३४३
-उत्तीर्ण विद्यार्थी : ८,३८,५८३ : ७,२३,८१० : १५,६२,३९३
-टक्केवारी : ९५.३८ : ९७.५२ : ९६.३६


*निकालाचा तपशील : शाळांची संख्या*
शून्य टक्के : २९
१ ते १० टक्के : ०१
१० ते २० टक्के : ०५

२० ते ३० टक्के : ०४
३० ते ४० टक्के : १८
४० ते ५० टक्के : ३८
५० ते ६० टक्के : ४१
६० ते ७० टक्के : १२३
७० ते ८० टक्के : ३२१
८० ते ९० टक्के : १,३३०
९० ते ९९.९९ टक्के : ८,८०१
१०० टक्के : १२,२१०
एकूण शाळा : २२,९२१

(नोट : बार चार्ट करणे)
...........
*सवलतीचे गुण मिळालेले विद्यार्थी*
मिळाली सवलत : विद्यार्थी संख्या
चित्रकला : १,२८,७४५
क्रीडा : १५,५३०
स्काऊट गाइड : ५४२
नाट्यकला : ७
लोककला : १४, ५४९
शास्त्रीय नृत्य : १,९४५
शास्त्रीय गायन : २,०३६
शास्त्रीय वादन : १,४४४
एकूण : १,६४,७९८

(नोट : पाय चार्ट करणे)


*परीक्षेतील गैरप्रकार :*
तपशील : २०२२ : २०२०
-तोतया विद्यार्थी : ०१ : १६
-प्रत्यक्ष गैरप्रकार करताना आढळलेले (कॉपी प्रकरणे): ७९ : ५७२
इतर, पेपर तपासताना आढळलेले (उत्तरपत्रिकेत धमकी देणे, विनंती करणे आदी) : ३२ : --

*दिव्यांग विद्यार्थ्यांचा निकाल *
प्रकार : उत्तीर्ण विद्यार्थी : टक्केवारी
दृष्टिहीन/ दृष्टिदोष : १,०७८ : ९७.२०
श्रवण कमजोरी : १,४७१ : ८९.२६
इंटलेक्च्युअल डिसॅब्लिटी : ८२२ : ९२.८८
मल्टिपल डिसॅब्लिटिज्‌ : ११८ : ८८.७२
मानसिक आजार : ३०० : ८६.७१

Web Title: Todays Latest Marathi News Pne22m80743 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top