धार्मिक, सामाजिक संस्कृतीचे मंदिर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

धार्मिक, सामाजिक संस्कृतीचे मंदिर
धार्मिक, सामाजिक संस्कृतीचे मंदिर

धार्मिक, सामाजिक संस्कृतीचे मंदिर

sakal_logo
By

लीड---------कै. लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिर संस्थान, पुणे या संस्थेचा यंदा शतकोत्तर रौप्य महोत्सव आहे. रविवारी (ता. १९) जून रोजी एकशे पंचवीस वर्ष पूर्ण होत आहेत. शतकोत्तर रौप्य महोत्सवाची सुरुवात २७ मे रोजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद व माजी राष्ट्रपती श्रीमती प्रतिभाताई पाटील यांच्या उपस्थितीत कै. लक्ष्मीबाई यांच्या नावाने देण्यात येणाऱ्या लक्ष्मीबाई पुरस्कार वितरणाने व ‘दत्त’ या कॉफी टेबल पुस्तकाच्या अनावरण कार्यक्रमाने झाली.

- अॅड. प्रताप व्ही. परदेशी
अध्यक्ष, कै. लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिर ट्रस्ट, पुणे


स्वातंत्र्य प्राप्तीच्या चळवळीत अनेक नामवंत स्वातंत्र सैनिक व नेते हे दगडूशेठ हलवाई यांच्या संपर्कात होते. मंदिराची जागा ही पूर्वी दगडूशेठ हलवाई व त्यांच्या पत्नी लक्ष्मीबाई यांचे राहते घर होते. दत्त मंदिराच्या परिसरात कै. दगइशेठ हलवाई यांच्याबरोवर लोकमान्य टिळक, सरदार खाजगीवाले, भाऊसाहेब रंगारी तसेच, अनेक स्थानिक स्वातंत्र्य सैनिकांच्या बैठका दत्त मंदिरामध्ये (पूर्वीचे घर) झाल्याचे त्या काळातील जाणकार सांगत होते. दगडूशेट व त्यांच्या पत्नीने त्याकाळी या चळवळीला सर्व प्रकारे मदत केल्याचे अनेक जुने जाणकार सांगतात. याच कालावधीमध्ये क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांनी मंदिरात भेट देवून, पुढे श्री दत्तात्रेय यांच्या प्रेरणेने शिक्षा भोगत असताना स्वतः हस्तलिखित गुरू चरित्र लिहिले. कै. तात्या गोडसे यांनी या मंदिराबद्दल स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्योत्तर काळातील अनेक महत्त्वाचे ऐतिहासिक व सामाजिक गोष्टी सांगितल्या होत्या.
अनेक सामाजिक उपक्रम मंदिरातर्फे सुरू आहेत. मंदिर मध्यवस्तीत असल्याने तेथील देवदासी भगिनींच्या मुलांची शिक्षणाची सोय म्हणून पाळणाघर व ‘माहेर’ संस्थेबरोबर बालवाडी सुरू केली. तसेच, त्या परिसरात सातत्याने आरोग्य शिबिरे आयोजित करण्यात आली. विशेष म्हणजे शतकोत्तर रौप्य महोत्सवाच्या निमित्ताने मंदिराने ‘स्वरूप-वर्धिनी’ या संस्थेबरोबर राज्यातील गरीब होतकरू विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षेला आवश्यक असणारी अभ्यासिका सुरू केली आहे.
लॉकडाउन व कोरोना काळात मंदिराने बुधवार पेठ परिसरातील सर्व देवदासी बंधू-भगिनींना सुमारे चार ते सहा महिने दोन्ही वेळेला श्री मुकुंद भवन ट्रस्ट यांच्या सहकार्याने अन्न वाटप उपक्रमांतर्गत त्यांच्या राहत्या घरी जाऊन, रोजच्या रोज अन्न वाटप करण्याचे काम यशस्वीपणे पार पाडले. कोरोनाच्या काळात मोठ्या प्रमाणात देवदासींचे मोफत लसीकरण स्वरूप-वर्धिनी संस्थेच्या माध्यमातून ट्रस्टकडून झाले. तसेच, मंदिर परिसरातील सर्व पथारीवाले, छोटे व्यापारी त्यांचे कामगार यांच्यासाठी मोफत लसीकरणाचा उपक्रम ट्रस्ट कडून आयोजित केला गेला.
ट्रस्टकडून पुणे शहर व परिसरातील अनेक अंधशाळा, निराधार बालकाश्रम, अनाथ आश्रम व मतिमंद मुलांच्या शाळेत अन्नदान, खाऊचे वाटप व त्यांना आवश्यक असणाऱ्या साहित्यांची उपलब्धता करण्याचा प्रयत्न अविरतपणे सुरू आहे. याशिवाय लक्ष्मीबाई यांच्या नावाने दरवर्षी पुणे शहर परिसर व राज्यातील निःस्वार्थीपणे उल्लेखनीय काम करणाऱ्या स्त्रियांचा लक्ष्मीबाई पुरस्कार देऊन गौरव करण्याचं काम मंदिराच्या माध्यमातून सुरु आहे. गुरुपौर्णिमेच्या वेळेस सामाजिक, शैक्षणिक व धार्मिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींना गुरू महात्मे पुरस्कार देऊन त्याचे बळ वाढवण्याचं काम ट्रस्ट करीत आहे.
गेली पंचवीस वर्ष दत्त जयंतीच्या वेळी सप्तस्वर उत्सवाच्या माध्यमातून अनेक जुन्या-नव्या कलाकारांच्या कार्यक्रमांचे आयोजन करून, संगीत सेवा करण्याची परंपरा मंदिर आजतागायत करीत आहे.
शतकोत्तर रौप्य महोत्सवाचे औचित्य साधून पुणे शहर व परिसरातील अनेक अनाथ आश्रम, मूकबधिर व अंध शाळा यांना वर्षभर धान्य पुरविण्याचा संकल्प यंदाच्या वर्षी आम्ही केलेला आहे. तसेच, मंदिर परिसरातील उपेक्षित, गरीब, देवदासी व अनेक कुटुंबीयांसाठी कायम आरोग्यसेवेचा उपक्रम आम्ही लवकरच डॉ. डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेज, पिंपरी याच्या संयुक्त विद्यमाने सुरू करण्याचा प्रयत्न करीत आहोत. शंभर वर्षापूर्वी लक्ष्मीबाईंनी सुरू केलेला हा सामाजिक, धार्मिक व सांस्कृतिक सेवेचा यज्ञ असाच पुढे चालू ठेवण्याचा प्रयत्न विश्वस्त मंडळ करीत आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22m80785 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top