ऑनलाईन बासरी प्रशिक्षणासाठी अकादमीची स्थापना | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ऑनलाईन बासरी प्रशिक्षणासाठी 
अकादमीची स्थापना
ऑनलाईन बासरी प्रशिक्षणासाठी अकादमीची स्थापना

ऑनलाईन बासरी प्रशिक्षणासाठी अकादमीची स्थापना

sakal_logo
By

पुणे, ता. १७ ः ‘अमूल्यज्योती’ संस्थेतर्फे ऑनलाइन पद्धतीने बासरीचे प्रशिक्षण देण्यासाठी ‘केशव वेणू फ्ल्यूट अकादमी’ची स्थापना केली आहे. प्रत्यक्ष गुरूंकडून बासरी शिकणे शक्य नसलेल्या व्यक्तींना या माध्यमातून बासरीचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण घेणे शक्य होणार आहे, अशी माहिती ज्येष्ठ बासरीवादक व संस्थेचे संस्थापक पं. केशव गिंडे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.

‘‘अकादमीच्या ‘केशव वेणू फ्ल्‍यूट अकादमी’ या यूट्यूब चॅनेलवर हा अभ्यासक्रम सर्वांसाठी विनामूल्य उपलब्ध होणार आहे. १७ जूनपासून प्रत्येक शनिवारी या चॅनेलवर एक भाग अपलोड केला जाणार आहे. बासरी धरणे, फुंकीचे तंत्र, बोट ठेवण्याची शास्त्रशुद्ध पद्धत, अलंकार, स्वर, ताल, ठुमरी, टप्पा, भजन, धृपद अंग या बासरी आणि संगीतातील विविध विषयांचा सखोल अभ्यास करता येईल, अशी या अभ्यासक्रमाची रचना आहे. या चॅनेलवरून शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन व्हिडिओ कॉलिंगद्वारे आठवड्यातून एक दिवस गुरूंचे मार्गदर्शन मिळू शकते. यासाठी विद्यार्थी अकादमीशी ९००४३९६००६ या क्रमांकावर व्हॉट्सअॅपद्वारे संपर्क साधू शकतात’’, असे पं. गिंडे यांनी सांगितले.

‘केशव नाम वेणू’ची निर्मिती
पं. केशव गिंडे हे गेली काही वर्षे सातत्याने बासरीवर संशोधन करत आहेत. काही वर्षांपूर्वी त्यांनी चार सप्तके वाजवण्याची क्षमता असलेल्या चार फूट लांबीच्या ‘केशव वेणू’ची निर्मिती केली होती. मात्र, या बासरीची लांबी अधिक असल्याने प्रत्येकाला ही बासरी हाताळणे, सहजशक्य नव्हते. त्यामुळे याच्यावर अधिक संशोधन करून पं. गिंडे यांनी आता इंग्रजी ‘यू’ आकाराच्या नव्या बासरीची निर्मिती केली आहे. याही बासरीतून सुमारे ४८ स्वर म्हणजेच ८८ श्रुती वाजवणे शक्य होणार आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22m80871 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top