कोंढव्यात मित्राकडून तरुणीवर बलात्कार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कोंढव्यात मित्राकडून तरुणीवर बलात्कार
कोंढव्यात मित्राकडून तरुणीवर बलात्कार

कोंढव्यात मित्राकडून तरुणीवर बलात्कार

sakal_logo
By

पुणे, ता. १७ ः मैत्रिणीस लग्नाचे आमिष दाखवून तरुणाने तिच्यावर बलात्कार केला. तसेच मित्रांशी संगनमत करून तरुणीचे व्हिडिओ समाजमाध्यमांवर प्रसारित करण्याची धमकी दिली. याप्रकरणी तरुण, त्याच्या मित्रांसह आई व बहिणीविरुद्धही कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रेहान सय्यद, शाहरुख शेख, सोहेल पठाण तसेच रेहानची आई व बहिणीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी एका तरुणीने कोंढवा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी व आरोपी रेहान सय्यद यांची एकमेकांशी मैत्री होती. त्यानंतर त्याने तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. दरम्यान, तरुणीस लग्नाचे आमिष दाखवून त्याने तिच्यावर बलात्कार केला. रेहानने त्याचा मित्र अरबाज शेख याच्याशी संगनमत करून तरुणीचे मोबाईलमध्ये व्हिडिओ चित्रीकरण केले होते. संबंधित व्हिडिओ शाहरुख व सोहेल या दोघांनाही रेहानने पाठविला होता. त्यानंतर शाहरुख व सोहेलने तरुणीला धमकावण्यास सुरुवात केली होती. या धमक्‍यांना व त्रासाला कंटाळून तरुणीने याबाबत रेहानची आई व बहिणीला घडणाऱ्या प्रकाराबाबत माहिती दिली. त्यावेळी त्यांनीही तिला शिवीगाळ करून मारहाण केली. तसेच तिचा व्हिडिओ समाजमाध्यमावर प्रसारित करण्याची धमकी दिली. या सगळ्या प्रकारामुळे घाबरलेल्या तरुणीने पोलिसांकडे फिर्याद दाखल केली. या प्रकरणाचा तपास पोलिस उपनिरीक्षक समाधान मचाले करीत आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22m80912 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top