
‘आरोग्य भारती’तर्फे गरिबांसाठी अल्पदरात सेवा
पुणे, ता. १७ : आरोग्य भारती आणि आयुर्वेद व्यासपीठातर्फे चालविण्यात येणाऱ्या आनंदी आरोग्य सेवा केंद्राचे उद्घाटन आरोग्य भारती संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. राकेश पंडित यांच्या हस्ते झाले.
या वेळी डॉ. सुरेश पाटणकर, डॉ. मुकेश कसबेकर, डॉ. व्ही. डी. कुलकर्णी, अरुणा चाफेकर डॉ. उल्का फडके, डॉ. शिरीष राऊत, गौरी पारखी, प्रदीप फासे, अमेय वाघ आदी उपस्थित होते.
लोकमान्य नगरमधील वरद इमारतीमध्ये ‘आनंदी आरोग्य सेवा केंद्र’चे कामकाज चालणार आहे. या केंद्रात पुणे शहरातील गरीब, गरजू रुग्णांसाठी अल्पदरामध्ये (रुपये शंभर फक्त) सर्व पॅथीमधील डॉक्टरांचा सल्ला आणि माफक दरात वैद्यकीय तपासण्या तसेच उपचार उपलब्ध करून देण्यात आले आहेत. सोमवार ते शनिवार सायंकाळी पाच ते सात या कालावधीत हे आरोग्य सेवा केंद्र सुरू राहणार आहे.
डॉ. अरुणा चापेकर, डॉ. उल्का फडके, डॉ. शिरीष राऊत, डॉ. गिरीश कामत, डॉ. संतोष गटणे, डॉ. सुहास शहा, डॉ. अजय शहा, डॉ. माला पाटील, वैद्य अजित जोशी आणि वैद्य चंद्रकांत तथा प्रसाद लावगणकर आदी तज्ज्ञांचे वैद्यकीय पथक रुग्णांना तपासण्यासाठी तसेच उपचारांसाठी उपलब्ध असणार आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Pne22m81016 Txt Pune Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..