भूगाव रस्त्यावरील चौकाच्या रुंदीकरणासाठी अडीच कोटी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भूगाव रस्त्यावरील चौकाच्या
रुंदीकरणासाठी अडीच कोटी
भूगाव रस्त्यावरील चौकाच्या रुंदीकरणासाठी अडीच कोटी

भूगाव रस्त्यावरील चौकाच्या रुंदीकरणासाठी अडीच कोटी

sakal_logo
By

पुणे, ता. १७ ः शहरातील अनेक चौकांमधील भूसंपादनाचा प्रश्‍न गंभीर झाला आहे. प्रशासनाने त्यास प्राधान्य देण्याऐवजी थेट शहराच्या वेशीवरील भविष्यातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी तब्बल दोन कोटी ३८ लाख रुपयांच्या खर्चास स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता दिली. भूगाव रस्त्यावरील हॉटेल ॲम्ब्रोसिया व बावधनकडे जाणाऱ्या चौकाच्या परिसरात ६०० मीटरचे रुंदीकरण करून सिमेंट कॉक्रिटचा रस्ता केला जाणार आहे. भविष्यात या ठिकाणी उड्डाणपूल किंवा भुयारी मार्ग बांधण्याचे नियोजन आहे.

चांदणी चौकातील उड्डाणपुलाचे काम पूर्ण झाल्यानंतर भूगावकडे जाणारी वाहतूक मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. अशा स्थितीत या ठिकाणी बावधनकडे जाणारा रस्ताही आहे. त्यामुळे भविष्यात या चौकात कोंडी होणार आहे. त्यामुळे दोन्ही बाजूस १२ मीटरचा रस्ता व तीन मीटर पादचारी मार्ग विकसित केले जातील. तर दहा मीटरचा दुभाजक असणार आहे.

‘‘चांदणी चौकापासून हा चौक सुमारे सव्वा किलोमीटर लांब आहे. पण, या ठिकाणी तीन रस्ते एकत्र येत असल्याने वाहतूक कोंडी होत आहे. त्यामुळे हा रस्ता ५०० मीटर लांब व दहा मीटर रुंद केला जाणार आहे. भविष्यात येते उड्डाणपूल किंवा भुयारी मार्ग बांधला जाणार आहे.’’

- अजय वायसे, कार्यकारी अभियंता, प्रकल्प विभाग

Web Title: Todays Latest Marathi News Pne22m81081 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top