धायरी परिसरात पाणीटंचाई खडकवासला धरणाच्या दरवाजांच्या दुरुस्तीमुळे प्रश्न | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

धायरी परिसरात पाणीटंचाई 
खडकवासला धरणाच्या दरवाजांच्या दुरुस्तीमुळे प्रश्न
धायरी परिसरात पाणीटंचाई खडकवासला धरणाच्या दरवाजांच्या दुरुस्तीमुळे प्रश्न

धायरी परिसरात पाणीटंचाई खडकवासला धरणाच्या दरवाजांच्या दुरुस्तीमुळे प्रश्न

sakal_logo
By

पुणे, ता. १७ : खडकवासला धरणाच्या दरवाजांच्या देखभाल, दुरुस्तीचे काम सध्या सुरू आहे. यामुळे धरणातील पाणी पातळी कमी झाली आहे. त्याचा फटका धायरी, नऱ्हे यासह परिसरातील नागरिकांना बसला असून, गेल्या दोन तीन दिवसांपासून नागरिकांना तीव्र पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे.

धायरी, नऱ्हे, किरकटवाडी, नांदेड यासह इतर गावांना या भागातील विहिरीतून पाणी पुरवठा केला जातो. धायरीला बारांगनी मळ्यातील विहिरीतून पाणी दिले जाते. खडकवासला धरणातून पर्वती येथे येणाऱ्या ३००० मीमी व्यासाच्या जलवाहिनीतून १६ इंचाचे दोन जोड देण्यात आला असून, त्यातून हे पाणी या विहिरीत टाकले जाते. तेथून पंपिंग करून या गावांमध्ये पाणी पोचविले जाते.

पावसाळ्याच्या पूर्वी पाटबंधारे विभागाकडून धरणाचे दारे व्यवस्थित उघडतात की नाही याची तपासणी केली जाते. या वेळी धरणाचे दारे पूर्णपणे उघडले जातात. त्यासाठी धरणाची पाणी पातळी खाली न्यावी लागते. सध्या हे काम सुरू असल्याने पाणी पातळी कमी झाल्याने जलवाहिनीतून पाणी कमी येत असल्याने विहिरीत पाणी कमी पडत आहे. पुढील तीन चार दिवस अशीच स्थिती राहील, असे पाणी पुरवठा विभागाचे प्रमुख अनिरुद्ध पावसकर यांनी सांगितले.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22m81095 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top