आषाढी वारीवर छायाचित्र स्पर्धा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आषाढी वारीवर छायाचित्र स्पर्धा
आषाढी वारीवर छायाचित्र स्पर्धा

आषाढी वारीवर छायाचित्र स्पर्धा

sakal_logo
By

पुणे, ता. १८ ः ‘सकाळ माध्यम समूहा’तील ‘सकाळ सोशल फाउंडेशन’तर्फे आषाढी वारीवर आधारित ‘आरोग्य वारी’ प्रकल्पांतर्गत ‘इंद्रायणी ते चंद्रभागा - एक चित्रप्रवास’ ही छायाचित्र स्पर्धा आयोजित करण्यात येत आहे. हौशी, नवोदित व अनुभवी छायाचित्रकारांसाठी ही स्पर्धा खुली असून, विजेत्यांना एकूण रोख २५ हजारांची पारितोषिके देण्यात येणार आहेत.

पालखी सोहळा व वारीदरम्यानच्या काळातील वारीत सहभागी होणाऱ्या विविध दिंड्यांशी संबंधित छायाचित्रांचा स्पर्धेत समावेश असावा. मोबाईल अथवा अन्य सर्व प्रकारच्या कॅमेऱ्यामधून छायचित्रे काढलेली असावीत. छायाचित्रांमध्ये वारकऱ्यांच्या भावमुद्रा, वारीतील प्रसंग, मुक्काम काळातील वातावरण, वारकऱ्यांचे खेळ, रिंगण सोहळा, वारीमधील विविध सामाजिक उपक्रम आदी समावेश असावा.

वारीतील वेगळेपण टिपण्याचा स्पर्धकांनी प्रयत्न केल्यास छायाचित्र पाठविताना तसा आवर्जून उल्लेख करावा. प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकास अनुक्रमे दहा हजार, सात हजार, पाच हजार रुपयांची तीन पारितोषिके व प्रत्येकी एक हजार रुपयांची तीन उत्तेजनार्थ पारितोषिके देण्यात येतील. तसेच, प्राप्त झालेल्या सर्व छायाचित्रांमधून निवडक छायाचित्रांचे प्रदर्शन भरविण्यात येणार आहे.

स्पर्धेचे नियम ः
१. यंदाच्या (२०२२) आषाढी वारीत घेतलेल्या छायाचित्रांचा समावेश असावा.
२. स्पर्धकांनी ८ बाय १२ (ए-फोर) आकारातील छायाचित्रे wari2022@esakal.com या ई-मेलवर पाठवावीत.
३. फोटो मेलवर पाठवताना प्रत्येक फोटो फाईलची साईज पाच एमबीपर्यंत असावी.
४. प्रत्येक स्पर्धक २५ ते ३० छायाचित्र पाठवू शकतील.
५. प्रत्येक छायाचित्रासोबत स्पर्धकांनी आपले नाव, मोबाईल क्रमांक, तारीख, छायाचित्र काढलेले ठिकाण व प्रसंगाचे नाव ही माहिती फोटोच्या एका कोपऱ्यात (मूळ छायाचित्राला बाधा पोहचू न देता) वॉटर मार्क करून पाठवायची आहेत.
६. मूळ छायाचित्रांवर कोणतेही संगणकीय कृत्रिम बदल केलेले नसावेत.

अधिक माहितीसाठी संपर्क : ८६०५०१७३६६

Web Title: Todays Latest Marathi News Pne22m81298 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top