पुढील दहा वर्षात एचआयव्ही पूर्णपणे बरा होणार डॉ. हिंमतराव बावस्कर यांचे मत; मानव्य संस्थेच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त कार्यक्रम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पुढील दहा वर्षात एचआयव्ही पूर्णपणे बरा होणार

डॉ. हिंमतराव बावस्कर यांचे मत; मानव्य संस्थेच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त कार्यक्रम
पुढील दहा वर्षात एचआयव्ही पूर्णपणे बरा होणार डॉ. हिंमतराव बावस्कर यांचे मत; मानव्य संस्थेच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त कार्यक्रम

पुढील दहा वर्षात एचआयव्ही पूर्णपणे बरा होणार डॉ. हिंमतराव बावस्कर यांचे मत; मानव्य संस्थेच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त कार्यक्रम

sakal_logo
By

पुणे, ता. १८ ः ‘‘मी कधीही देवाची पूजा करत नाही, उदबत्ती लावत नाही, पण, रुग्ण मात्र तपासतो. एचआयव्हीकडे कलंक म्हणून पाहिले जाते. मात्र, पुढील दहा वर्षात एचआयव्ही पूर्णपणे बरा होणार आहे,’’ असे मत सामाजिक कार्यकर्ते डॉ. हिंमतराव बावस्कर यांनी व्यक्त केले.
मानव्य संस्थेच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमात डॉ. बावस्कर बोलत होते. यावेळी माजी खासदार व भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेचे अध्यक्ष डॉ. विनय सहस्रबुद्धे, संस्थेचे अध्यक्ष शिरीष लवाटे, संस्थेच्या विश्वस्त उज्ज्वला लवाटे, समीर ढवळे उपस्थित होते. या प्रसंगी ‘मानव्यच्या पाऊलखुणा’ या स्मरणिकेचे प्रकाशन केले. तसेच डॉ. विद्या पाटील, श्याम कंधारे, हर्षिला मनसुखानी यांचा विशेष सत्कार केला.

डॉ. बावस्कर म्हणाले, ‘‘लहानपणी फुटक्या पाटीवर जेवढे प्रेम केले, तेवढेच प्रेम पुस्तकावर आजही करतो. त्यामुळे माझ्यातील संशोधक अजूनही जागा आहे. खेड्यापाड्यातील डॉक्टरांना शिकवले. तसेच वैद्यकीय सेवा देण्यास प्राधान्य दिले. संशोधन हे समाजोपयोगी झाले पाहिजे. धनसंपत्तीवर प्राप्तिकराची धाड पडू शकते. चोरी होऊ शकते. पण, ज्ञानसंपत्तीवर धाड मारता येत नाही. ती देशाच्या प्रगतीसाठी वापरली जावी. ’’

डॉ. सहस्रबुद्धे म्हणाले, ‘‘विजयाताईच्या निधनानंतर संस्थेचा निरसलपणे वारसा सुरू असून, मानवी यज्ञ संस्थेने उभा केला आहे. त्या सामान्यातील असामान्य सामाजिक कार्यकर्त्या होत्या. समाजावरील प्रेम आणि उपेक्षितांचे देणे लागतो, या भावनेतून त्यांनी हा वटवृक्ष उभा केला. त्यामुळे त्या खऱ्या अर्थाने समाज माऊली ठरतात.’’
स्वनाथांच्या मागे उभे राहणे हे समाजाचे कर्तव्य आहे. परिश्रम, त्याग, समर्पण, बांधिलकी या मूल्यांचे भारतीय परंपरेत महत्त्व आहे. औद्योगिक क्रांतीनंतर प्रबंधन, सादरीकरण, उत्पादकता, परिणामभिमुखता ही मूल्ये उदयास आली. ही दोन्ही मूल्य परंपरा अंगीकारणारी माणसे स्वयंसेवी संस्थेमध्ये हवीत, असे त्यांनी यावेळी सांगितले.

संस्थेचे अध्यक्ष शिरीष लवाटे यांनी प्रास्ताविक केले. ते म्हणाले, ‘‘एड्स आजाराकडे अजूनही कलंक म्हणूनच पाहिले जात आहे. एचआयव्ही बाधित मुलांना नोकरी दिल्यावर लगेच काढून टाकल्याच्या घटना घडल्या आहेत. समाजाने ‘‘एचआयव्ही’’ बाधित मुलांना स्वीकारले पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले. विनया देसाई यांनी सूत्रसंचालन केले.

PPRTT22B08030 , PPRTT22B08031

Web Title: Todays Latest Marathi News Pne22m81412 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top