
टिळक शिक्षण महाविद्यालयाच्या वर्धापन दिनानिमित्त कार्यक्रम
पुणे, ता. १९ : शिक्षण प्रसारक मंडळीच्या टिळक शिक्षण महाविद्यालय सोमवारी (ता.२०) ८२ व्या वर्षात पदार्पण करत आहे. यानिमित्त सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. संजीव सोनावणे यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम आयोजित केला आहे. हा कार्यक्रम सर परशुरामभाऊ महाविद्यालयाच्या लेडी रमाबाई हॉलमध्ये सोमवारी सायंकाळी साडे चार वाजता होईल.
शिक्षक प्रशिक्षणाच्या क्षेत्रात या महाविद्यालयाने आतापर्यंत अत्यंत मोलाची कामगिरी केली आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात २० जून १९४१ रोजी टिळक शिक्षण महाविद्यालयाची स्थापना झाली. महाविद्यालयाच्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ज्येष्ठ साहित्यिक डॉ. न. म. जोशी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. यावेळी शिक्षण प्रसारक मंडळीचे अध्यक्ष ॲड. सदानंद फडके, उपाध्यक्ष गजेंद्र पवार, नियामक मंडळाचे अध्यक्ष ॲड. एस. के. जैन, उपाध्यक्ष श्रीकृष्ण चितळे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
महाविद्यालयातून उत्तम शिक्षण घेऊन बाहेर पडलेले हजारो विद्यार्थी आज विविध नामवंत शाळांमध्ये, शिक्षण संस्थांमध्ये, महाविद्यालयांत शिक्षक, प्राचार्य, प्राध्यापक, पर्यवेक्षक यासारख्या उच्च पदांवर कार्यरत आहेत. महाविद्यालयाचे ब्रीदवाक्य म्हणजे ‘उत्कृष्टतेचा ध्यास’ हे महाविद्यालयाचे ब्रीदवाक्य आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Pne22m81613 Txt Pune Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..